IAS टीनाच्या अगोदर जयपूरच्या महालात या बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी बांधली लग्नगाठ |Tv Entertainment news IAS Tina Dabi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IAS टीनाच्या अगोदर जयपूरच्या महालात या बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी बांधली लग्नगाठ

Teena Dabe And Dr.Pradip Gawande

Bollywood News: जयपूरच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये आयएएस टॉपर टीना डाबी ही डॉ.प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या लग्नाची चर्चा आहे. त्यांची जोडी ही सोशल मीडीयावर देखील चर्चेत आली आहे. (Bollywood celebrity) एका सनदी अधिकाऱ्याच्या लग्नाची चर्चा हा नेटकऱ्यांसाठी वेगळा विषय झाला आहे. ज्याठिकाणी टीनाचं लग्न होणार आहे त्याठिकाणी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींचे लग्न झाले होते. आपण त्याविषयी माहिती घेणार आहोत.

  रविना टंडन - अनिल थडानी  
22 फेब्रुवारी 2004 मध्ये रवीनानं उद्योगपती अनिल थडानी यांच्याशी लग्न केलं. त्यांचं लग्न हे उदयपूरमधील शिव निवास पॅलेसमध्ये झालं  होतं. जेव्हा भारतातील सर्वात जुन्या अशा राजघराण्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो तेव्हा शिव निवासचे नाव घेतले जाते.

रविना टंडन - अनिल थडानी 22 फेब्रुवारी 2004 मध्ये रवीनानं उद्योगपती अनिल थडानी यांच्याशी लग्न केलं. त्यांचं लग्न हे उदयपूरमधील शिव निवास पॅलेसमध्ये झालं होतं. जेव्हा भारतातील सर्वात जुन्या अशा राजघराण्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो तेव्हा शिव निवासचे नाव घेतले जाते.

कतरिना कैफ - विकी कौशल - गेल्या वर्षी 9 डिसेंबर 2021 कतरिना आणि विकीचं लग्न जयपूरमधील एका पॅलेसमध्ये झालं होतं. त्या लग्नाला बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी हजर होते. बॉलीवूडमधील सर्वात चर्चेतील लग्न म्हणून त्याकडे पाहिले गेले होते.

कतरिना कैफ - विकी कौशल - गेल्या वर्षी 9 डिसेंबर 2021 कतरिना आणि विकीचं लग्न जयपूरमधील एका पॅलेसमध्ये झालं होतं. त्या लग्नाला बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी हजर होते. बॉलीवूडमधील सर्वात चर्चेतील लग्न म्हणून त्याकडे पाहिले गेले होते.

 * प्रियंका चोप्रा - निक जोन्स 
 राजस्थानातील उम्मेद भवन पॅलेसमध्ये ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा आणि निक जोन्सचं लग्न झाले होते. त्याचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्य़ाठिकाणी त्या दोघांचा कॅथलिक आणि भारतीय रिती रिवाजानुसार विवाह सोहळा पार पडला होता.

* प्रियंका चोप्रा - निक जोन्स राजस्थानातील उम्मेद भवन पॅलेसमध्ये ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा आणि निक जोन्सचं लग्न झाले होते. त्याचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्य़ाठिकाणी त्या दोघांचा कॅथलिक आणि भारतीय रिती रिवाजानुसार विवाह सोहळा पार पडला होता.

नील नितीन मुकेश - रुक्मिणी  
भलेही नितीन मुकेशचं लव्ह मॅरेज नसेल मात्र त्याच्या लग्नाची स्टोरी ही वेगळीच आहे. त्याची त्यावेळी सोशल मीडीयावर चर्चा होती. त्याची मैत्रीण रुक्मिणी यांनी उदयपूरमध्ये लग्न केले होते. रॅडिसन ब्ल्यु पॅलेसमध्ये हे लग्न केले होते. तीन दिवस हा लग्न सोहळा सुरु होता.

नील नितीन मुकेश - रुक्मिणी भलेही नितीन मुकेशचं लव्ह मॅरेज नसेल मात्र त्याच्या लग्नाची स्टोरी ही वेगळीच आहे. त्याची त्यावेळी सोशल मीडीयावर चर्चा होती. त्याची मैत्रीण रुक्मिणी यांनी उदयपूरमध्ये लग्न केले होते. रॅडिसन ब्ल्यु पॅलेसमध्ये हे लग्न केले होते. तीन दिवस हा लग्न सोहळा सुरु होता.

go to top