Jalgaon News: जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत लवकरच 10 रुग्णवाहिका; जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यास यश

Ambulance
Ambulanceesakal

Jalgaon News : जिल्हा रूग्णालय व अधिनस्त ग्रामीण रुग्णालयांना जिल्हा वार्षिक योजनेतून १० नवीन रुग्णवाहिका खरेदीस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजुरी दिली होती.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पाठपुराव्यामुळे रुग्णवाहिका खरेदीच्या प्रस्तावास आरोग्य सेवा आयुक्तांनी एका दिवसातच तांत्रिक मान्यता दिली आहे. जानेवारी २०२४ पर्यंत या नवीन रुग्णवाहिका रूग्णसेवेत दाखल होणार आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी दिली. (10 ambulances soon in district health service jalgaon news)

९ रुग्णवाहिकांचा प्रस्ताव

जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ अंतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालय व त्यांच्या अधिनस्त ९ ग्रामीण रुग्णालयांना रुग्णवाहिका खरेदी करण्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाने याबाबतचा तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव ८ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई येथे आरोग्य सेवा आयुक्त कार्यालयास पाठविला‌.

प्रस्तावास तत्काळ तांत्रिक मान्यता

एरवी प्रस्ताव पाठविल्यानंतर या प्रस्तावाच्या तांत्रिक मान्यतेस साधारणतः: दीड महिना लागतो. मात्र जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

Ambulance
Jalgaon News : अमळनेरात हजारो कुणबी नोंदी सापडल्या; जीर्ण कागदपत्रांची पडताळणी

धीरजकुमार यांनी गतिमान प्रशासनाचा वस्तुपाठ घालून देत प्रस्तावाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबरला प्रस्तावास तांत्रिक मान्यता दिली.

याठिकाणी मिळणार रुग्णवाहिका

तांत्रिक मान्यतेनंतर आता रुग्णवाहिका खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयास एक रुग्णवाहिका व ग्रामीण रूग्णालय न्हावी (ता.यावल), बोदवड, अमळनेर, एरंडोल, भडगाव, पाचोरा, मेहुणबारे (ता.चाळीसगाव), पहुर (ता.जामनेर) व पिंपळगाव - हरेश्र्वर (ता.पाचोरा) येथे प्रत्येक अशा एकूण १० नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत. रुग्णवाहिका खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेत १ कोटी ८० लाख ६३ हजार रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

Ambulance
Jalgaon PWD News : चौपदरीकरण पूर्ण.. तरी दिवे नाही; मनपाच्या उदासीनतेमुळे अजिंठा मार्गावर ‘अंधेरा’ कायम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com