11 lakhs of gold looted from jewellery shop in Sarafa Bazar area jalgaon crime news
11 lakhs of gold looted from jewellery shop in Sarafa Bazar area jalgaon crime newsesakal

Jalgaon Crime: 2 दुचाकींवर आले 6 चोरटे.. 23 मिनिटांत 11 लाखांचे सोने लंपास; चौक्यांसह कॅमेरे नावालाच

Jalgaon Crime : शहरातील सर्वाधीक सुरक्षित समजल्या जाणारा सराफ बाजार परिसरात ज्वेलर्सचे दुकान फोडून ११ लाखांचे सोने लंपास करण्यात आल्याची घटना बुधवारी (ता.२२) मध्यरात्रीनंतर घडली.

विशेष म्हणजे एका बाजूला शनिपेठ पोलिस ठाण्याची भिलपुरा चौकी, दुसरी बाजूला शहर पोलिसांची सुभाष चौक पोलिस चौकी, बाजारात डझनावर खासगी सुरक्षारक्षकांच्या नाकावर टिच्चून पहाटे पावणेचार ते सव्वाचारच्या दरम्यान चोरट्यांनी संभव ज्वेलर्स या सराफा दुकानाच्या शटरचे कान कापून आत प्रवेश केला.. अवघ्या २३ मिनिटांत चोरट्यांनी कामफत्ते केले. (11 lakhs of gold looted from jewellery shop in Sarafa Bazar area jalgaon crime news)

जळगाव शहरातील जोशीपेठेत काळभैरव मंदिराजवळ किशोर ओमप्रकाश वर्मा यांचे संभव ज्वेलर्स नावाने सराफा दुकान आहे. दुकानाच्या पहिल्या मजल्यावर कार्यालय आहे. दुसऱ्या मजल्यावर दागिन्यांची घडवण करणाऱ्या कारागिरांचे वर्कशॉप आहे. वर्मा यांच्याकडे आठ सराफा कामगार असून ते गेल्या अनेक वर्षांपासून सोबत जोडले गेलेले आहेत.

सर्व कामगार मूळ बंगाली कामगार असून सर्वच कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे काम करतात. त्यातील चार कामगार तीन ते चार महिन्यांपूर्वी गावी निघून गेले आहेत. किशोर वर्मा यांनी त्यांच्याकडे काम करणारा कारागीर मिलन चित्तरंजन पाकिरा याला दोन ते तीन दिवसांपूर्वी १०० ग्रॅम तर सुधार मदन सामंत याच्याकडे १०० ग्रॅम तर सुशांत राधानाथ मायती याच्याकडे ४८ ग्रॅम सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी दिले होते. मंगळवार(ता.२१) रोजी दिवसभर काम केल्यानंतर नेहमी प्रमाणे दुकान मालक रात्री साडेआठला घरी निघून गेल्यानंतर त्यांचे कारागीर रात्री १० वाजता दुकान बंद करून त्यांच्या राहत्या खोल्यांवर निघून गेले.

अशी समोर आली घटना

बुधवारी (ता.२२) पहाटे साडेचारच्या सुमारास किशोर वर्मा यांना त्यांच्यादुकानाजवळ राहणाऱ्या अनिल वर्मा यांनी तुमच्या दुकानात चोर घुसल्याची माहिती दिली. त्यानुसार वर्मा हे वडील व मोठ्या भावाला घेऊन तत्काळ दुकानावर आले. यावेळी त्यांना दुकानाचे लहान शटरचे कान तर आतील चॅनल गेट कोयंडे तुटलेले आढळले. त्यांनी दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन पाहणी केली.

11 lakhs of gold looted from jewellery shop in Sarafa Bazar area jalgaon crime news
Jalgaon Crime News : तरुणीवर अत्याचारप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल

११ लाखांचा माल लंपास

चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाचे दार तोडून वर्कशॉपमधील ड्रॉवरचे कुलूप तोडून आतील १८९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि घडवणीला आलेले कच्चे सोने (रॉ-मटेरिअल)असा एकूण १० लाख ७७ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२ दुचाकी, ६ चोर, २३ मिनिटे ११ लाखांचे सोने

सुरक्षित बाजारपेठ म्हणून सराफ बाजार समजला जातो. बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच शहर पोलिसांची सुभाष चौक पोलिस चौकी, तर उत्तरेकडून येणाऱ्या रस्त्यावर शनिपेठ पोलिसांची भिलपुरा चौकी आहे. पोलिस रेकॉर्डप्रमाणे दोन्ही पोलिस ठाण्याची वायरलेस वाहने, वॉकीटॉकीची पोलिस गस्त रात्रभर सुरु असते. प्रत्येक सराफाकडे खासगी सुरक्षारक्षक, रात्रभर जागरण करणारे वॉचमन नोकरीवर आहेत.

सुवर्ण बाजारात शेकडोच्या गणतीत ऑनलाइन सीसीटीव्ही कार्यरत आहेत. असे असताना पहाटे ३:४८ वाजता दोन दुचाकीवरून चोरट्यांच्या दुचाकी सराफ बाजारांत शिरल्या. इतर सर्व दुकाने सोडून नेमके संभव ज्वेलर्स याच दुकानावर येत मुख्य शटरचे कान तोडून चोरटे आत शिरले. दुकानात वेळ वाया न घालता थेट वर्कशॉपमधे शिरून कामगारांच्या टेबलाचे ड्रॉवर तोडत आतील तयार व कच्चे असा १० लाख ७७ हजार ३०० रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरुन आलेल्या देान्ही मोटारसायकली वरून ४:११ मिनिटांनी कुठल्याही अडथळ्या शिवाय निघून गेले.

11 lakhs of gold looted from jewellery shop in Sarafa Bazar area jalgaon crime news
Jalgaon Crime: एमआयडीसी पोलिसांच्या नाकर्तेपणात ‘एलसीबी’ने मारली बाजी; संशयित ‘साहेबा'मुळे निसटले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com