Jalgaon News : भुसावळ रेल्वे मंडळाला 142 कोटींचा महसूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Funds Approved News

Jalgaon News : भुसावळ रेल्वे मंडळाला 142 कोटींचा महसूल

जळगाव : भुसावळ रेल्वेच्या वाणिज्य मंडळाने जानेवारी महिन्यात १४२ कोटी ५३ लाखांचा महसूल मिळविला आहे. जानेवारी २०२२ मध्ये हा महसूल १०० कोटी २२ लाख होता. या वर्षी ४१ टक्क्यांपेक्षा जास्त महसूल विभागाने मिळविला आहे.

मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेनची कमाई ६८.१४ कोटी, मालगाडीतून पाठविलेल्या मालाच्या भाडेपोटी जानेवारी २०२२ मध्ये ६५.३१ कोटींची कमाई झाली होती. पार्किंगमधून ५४ लाख ११ लाखांचा महसूल मिळाला होता. तिकीट तपासणीतून ३ कोटी ५८ लाख महसूल मिळाला. (142 crore revenue to Bhusawal Railway Board 41 percent more than last year Performance in month of January Jalgaon News)

मालगाडीतून कांदा भरून या महिन्यात ३.६४ कोटी महसूल मिळाला. तो मनमाड, लासलगाव, निफाड, अंकाई किल्ल्यावर जाऊन भारतातील इतर प्रांतात जातो. खंडवा, बडनेरा, मलकापूर, पारस, बोरगाव येथून डी ऑईल केक लोडिंग करण्यात आले. ते एकूण २० रेक आहेत. त्याद्वारे ७.८२ कोटी महसूल प्राप्त झाला.

भुसावळ विभागात अंकाई किल्ला स्टेशन नवीन मालधक्का उघडण्यात आला. या माल धक्कातील पहिला कांदा रेक १४ जानेवारीला बाराचक जंक्शन स्टेशन आसनसोल विभाग पूर्व रेलवेसाठी लोड करण्यात आला.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

त्यातून १८ लाखांचा महसूल मिळाला. जानेवारी महिन्यात बुऱ्हानपूर स्थानकावर मालवाहतूक आणि माहिती प्रणालीची यंत्रणा बसवण्यात आली होती. आता पावती बुऱ्हानपूरमधूनच काढली जाईल. पूर्वी ही पावती खंडवा स्थानकावरून काढली जात होती.

नाशिक रोड स्थानकावरील एमपीएस स्टॉलचे कंत्राट एका वर्षासाठी दिले होते. त्यातून दरवर्षी दोन लाखांचा महसूल मिळेल. सुकेणे, टाकळी, जलंब स्थानकांवर स्टेशन तिकीट बुकिंग एजंट निवडले आहेत.