जळगाव कोरोनाचे जिल्ह्यात नवे १९१ रुग्ण

दिवसभरात ४६४ कोरोनामुक्त; सक्रिय रुग्णही घटले
Corona positive
Corona positive sakal

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा उतरता आलेख सुरू झाला आहे. सलग चौथ्या पाचव्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक नोंदली गेली. मंगळवारी नव्या १९१ रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात ४६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

Corona positive
पंधरा विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा केंद्र! दहावी-बारावीची परीक्षा नियोजित वेळेतच

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट तीव्र होण्याआधीच ओसरू लागली आहे. मंगळवारी अडीच हजारांहून अधिक म्हणजे २७७० चाचण्यांचे अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी १९१ रुग्ण बाधित आढळून आले. तर ४६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या घटून २३००वर आली आहे. गेल्या तीन दिवसांत सक्रिय रुग्ण तब्बल हजाराने कमी झालेत. जे रुग्ण आहेत, त्यातील २२५० रुग्ण लक्षणे विरहित असून केवळ ५० रुग्णांमध्ये लक्षणे आहेत. ५ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असून १५ रुग्ण आयसीयूत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com