Jalgaon News : रमजान के पहेले होगा तेरा गेम! ‘मुल्तानी गँग’ची भिस्तीवाड्यात तुफान दगडफेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

2 groups clashed beating and stones were pelted jalgaon crime news

Jalgaon News : रमजान के पहेले होगा तेरा गेम! ‘मुल्तानी गँग’ची भिस्तीवाड्यात तुफान दगडफेक

जळगाव : शाहूनगरमधील पत्री मशिदीजवळ मंगळवारी (ता. १४) रात्री एकच्या सुमारास दोन गटांत घमासान हाणामारी (Beating) होऊन तुफान दगडफेक करण्यात आली.

आदल्या दिवशीही असाच प्रकार घडला. परस्परविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवून शहर पोलिसांनी दोन्ही गटाला मोठ्या गुन्ह्यासाठी मोकळे सोडले आहे. (2 groups clashed beating and stones were pelted jalgaon crime news)

पत्री मशिदीपासून ते माजी नगरसेवक कदम यांच्या घरापर्यंत दोन्ही गटांचा मोठा जमाव एकवटून लाठ्याकाठ्यासंह दगडफेक होऊन एकच धावपळ उडाली. दहा-पंधरा दुचाकींवर सुसाट वेगात आलेल्या टोळक्याने मिळेल त्याला लाठ्याकाठ्यांनी आडवा करून तुडवून काढले.

परस्परविरुद्ध तक्रारी

आदल्या दिवशी झालेल्या भांडणाची पोलिसांत तक्रार दिल्याचा राग आल्याने राजा मुल्तानी, साहिल मुल्तानी, फरदीन मुल्तानी (रा. नुरानी मशिदीमागे) यांनी अन्सार हसन भिस्ती (वय २१) याला घराजवळ लाथाबक्क्यांनी मारहाण केली व टोळक्यानेही हल्ला चढविला. यात अन्सार भिस्ती जखमी झाला. जखमी भिस्ती याने दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली.

दुसऱ्या तक्रारीत फरदीनखान अमजदखान मुल्तानी (वय १८) पत्री मशिदीजवळ लघुशंका करीत असल्यावरून वाद होऊन अन्सार हसन भिस्ती, अख्तर भिस्ती, अयान भिस्ती यांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. नंतर दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

मग आले पोलिस...

परिसरातील रहिवाशांनी कधी नियंत्रण कक्षात, कधी शहर पोलिसांत, तर कधी जिल्‍हापेठ पोलिसांत फोन केल्यावर सायरन वाजवतच पोलिस गाड्या धडकल्या. परिणामी, हाणामारी करणारे सुसाट पळून गेले.

मुल्तानी गँगची दहशत

गेंदालाल मिल परिसरात मुल्तानी गँगची प्रचंड दहशत आहे. शाहूनगरात होणाऱ्या प्रत्येक हाणामारीत या गँगचा सहभाग असतो.

पोलिस कारकुनी पुरतेच शिल्लक

संवेदनशील शाहूनगरमध्ये सलग दोन दिवस घमासान हाणामारी, दगडफेक झाली. मात्र, शहर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी कुठलीच कारवाई केली नाही. दगडफेकीवेळी सायरन वाजवून गर्दी पांगविली. दगडफेक, दंगलीचा प्रकार असताना, कथित पोलिस मित्रांच्या मध्यस्थीने दुसऱ्या दिवशी परस्परविरुद्ध अदखलपात्र नोंद करून पोलिसांनी कारकुनीचे कर्तव्य बजावले व पोलिसांनी दोन्ही गटाला ‘आता कोर्टात जा’, असा सल्ला देऊन रवाना केले.

रमजान के पहेले होगा तेरा गेम!

शहर पोलिस ठाणे गुन्हेगारांच्या बऱ्यापैकी अंगवळणी पडले आहे. कथित पोलिस मित्रांनी दोन्ही बाजूची शटलमेंट करून साध्या तक्रारीवर या प्रकरणाची बोळवण केली असली, तरी मुल्तानी गँगने अन्सार याला सर्वांदेखत ‘रमजान के पहेले होगा तेरा गेम’, असे धमकावले असून, समोरच्या गटातर्फेही त्यास प्रतित्तूर दिल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :JalgaoncrimeBeating