Jalgaon News : पारोळ्यात पालिकेकडून 25 किलो प्लास्टिक जप्त

Carrybags seized by municipal officials and employees.
Carrybags seized by municipal officials and employees.esakal

Jalgaon News : सर्वत्र प्लास्टिक बंद असताना शहरात कॅरिबॅगचा सर्रास वापर होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्र्वभूमीवर पालिकेकडून मुख्य बाजारपेठेत कारवाई करून व्यावसायिकांकडून २५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.(25 kg of plastic seized from municipality in Parola jalgaon news)

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सर्रास प्लास्टिक पिशव्या देऊन मालविक्री केला जातो. परिणामी, या प्लास्टिक पिशव्यांमुळे अस्वच्छता निर्माण होत असून, यावर करडी नजर ठेवत पालिका पथकाने गुरुवारी (ता. ९) कारवाईचा बडगा उगारत अवैध प्लास्टिक जमा केले आहे.

या वेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी सुभाष थोरात, प्रभारी आरोग्य निरीक्षक तुकडू नरवाडे, स्वच्छ भारत अभियान प्रमुख शुभम कंखरे, मुकादम सिद्धार्थ इंगळे, संदीप पाटील, रुपेश करोसिया, कैलास वानखेडे या पथकाने रोडवरील अतिक्रमण लोटगाडीवरून प्लास्टिक जमा केले.

Carrybags seized by municipal officials and employees.
Jalgaon News : अमळनेरात हजारो कुणबी नोंदी सापडल्या; जीर्ण कागदपत्रांची पडताळणी

दरम्यान, शासनाकडून ज्या प्लास्टिक पिशव्यांबाबत बंदी आहे. ती बाजारात ग्राहकांना देऊ नये, याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच ही कारवाई दिवाळी पुरती नसून त्यात नेहमी सातत्य राहील, असे क्षेत्रीय अधिकारी सुभाष थोरात यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Carrybags seized by municipal officials and employees.
Jalgaon News : बोरीतून सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन : आमदार पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com