Jalgaon Crime News : साडेचार लाखांच्या गुटख्यासह तिघे ताब्यात

Jalgaon Crime News : साडेचार लाखांच्या गुटख्यासह तिघे ताब्यात
esakal

Jalgaon News : जळगाव-भुसावळ रोडवरील बुलेट शोरुमच्या पाठीमागील रो-हाऊसेसमध्ये गुटख्याचे गोदाम तयार करण्यात आले होते. (3 arrested with gutka worth four and half lakhs jalgaon crime news)

परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षकांसह एमआयडीसी पोलिसांनी तेथे छापा मारला असता, ३ संशयीतांसह ४ लाख ५३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत डीवायएसपी संदिप गावीत यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यांच्या सुचनेनुसार उपनिरीक्षक निलेश गोसावी, दीपक चौधरी, दत्तात्रय बडगुजर, संदिप धनगर यांच्या पथकासह परिविक्षाधीन उपअधिक्षक अप्पासाहेब पवार यांनी खात्री केल्यानंतर पथकासह अचानक छापा टाकला.

या ठिकाणी अमोल तुकाराम वनडोळे (वय २८, रा. शिरसोली), विनायक शालीक कोळी (वय ४७, रा. वाल्मीकनगर) आणि भुषण दादा तांबे(वय ३८, रा. शिवाजीनगर) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Jalgaon Crime News : साडेचार लाखांच्या गुटख्यासह तिघे ताब्यात
Jalgaon Crime News : भुसावळला भर दिवसा चोरी... रहिवाशांमध्ये घबराट

पोलिस पथकाला गोदामातून ५ पोते सागर पान मसाला, ४ पोती विमल, ४ पोते व्हि-वन सुगंधीत तंबाखु, तीन कार्टुन बॉक्समध्ये आरएमडी पानमसाला असे एकुण ४ लाख ५३ हजार ६४० रुपये किंमतीचा माल आढळला. हा माल जागेवरच पंचनामा करुन जप्त करण्यात आला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गुटखा माफियांची शक्कल

राष्ट्रीय महामार्गावर खेडे गावाच्या अलीकडेच पांडूरंगनगर, सदाशिवनगर अशा नव्या रहिवासी वस्त्या तयार होत आहेत. मोठमोठ्या बिल्डर्सतर्फे येथे अपार्टमेंट, रो-हाऊसेस तयार करुन विक्री करण्यात येत असल्याने कोणाला संशय येवु नये यासाठी गुटखा माफियांनी या घरांनाच गुटख्याच्या गोदामात रुपांतरीत केल्याचे आढळून आले आहे.

Jalgaon Crime News : साडेचार लाखांच्या गुटख्यासह तिघे ताब्यात
Crime News: प्रियकराच्या मारहाणीला कंटाळून प्रियसीची आत्महत्या; विषारी औषधाचे इंजेक्शन...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com