
MLA Chandrakant Patil : विधानसभा मतदारसंघातील पूल व रस्त्यांच्या ३० कोटी १५ लाखांची कामे अर्थसंकल्प व ‘नाबार्ड’मधून मंजूर करण्यात आली आहेत. याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रव्यवहार केला होता.
सततच्या पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाली असून, तशी बजेट प्लेट संबंधित विभागांकडे प्राप्त झाली आहे, असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मतदारसंघातील मंजूर झालेली कामे अशी आहेत. (30 crore sanctioned for bridges roads to Muktainagar jalgaon news)
नशिराबाद-मलकापूर २७० किमी राज्यमार्ग (२ कोटी ५० लाख), खिरोदा- वाकोद ४६ किमी राज्यमार्ग (१ कोटी ८५ लाख), पुलाच्या बांधकामासह सुधारणा करणे (१ कोटी २० लाख), रावेर -चढोदा रस्ता (४७ किमी) सुधारणा करणे, नशिराबाद मलकापूर रस्ता (२७० किमी) सुधारणा करणे (२ कोटी २५ लाख), वरणगाव - बुधोनखेडा ते जिल्हा हद्द (२८ किमी) कॉक्रिट गटर, संरक्षकभिंत व स्लॅब ड्रेनच्या बांधकामासह सुधारणा करणे (१ कोटी ५० लाख), किन्ही -येवती रस्ता (४७ किमी) रुंदीकरणासह सुधारणा करणे (२ कोटी).
पूरनाड, नायगाव राज्यमार्ग ते पिंप्री पंचम लोहारखेडा पिंप्री भोजना ते राष्ट्रीय महामार्ग ७५३ (९५ किमी) सुधारणा करणे (१ कोटी ५० लाख), रा.मा. ६ ते तळवेल -चिखली मार्ग रस्ता (२५ किमी) मोरी बांधकामासह सुधारणा करणे (१ कोटी ५० लाख), प्रजिमा- १६ ते चांगदेव- मुक्ताईनगर (१ कोटी ५० लाख), पिपरी अकराउत ते निमखेडी ते सारोळा मण्यारखेडा ते प्रजिमा २५ रमा प्रजीमा ९३ किमी सुधारणा करणे मुक्ताईनगर (१ कोटी ५० लाख).
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जुने कुंड -घोडसगाव नवे ते राम ७५३ एल ते मुक्ताईनगर नवे कोथळी (१ कोटी ५०लाख), राम ६ -(२३ किमी) सुधारणा करणे (१ कोटी ५० लाख). नवे बोरखेडा -मच्छींद्रनाथ मंदिर रस्ता (९४ किमी) सुधारणा करणे (१ कोटी २० लाख). धामनगाव नवे -भोटा सुळे ते चिंचखेडा खुर्द -जोंधनखेडा रस्ता (९२ किमी) पुलाचे बांधकाम करणे (२ कोटी ६५ लाख ४७ हजार). या कामांसह थोरगव्हाण गावाजवळील पूल (४ कोटी ६२ लाख), उडळीजवळील पूल (४ कोटी ६२ लाख), दसनूर गावाजवळील संरक्षकभिंत (२ कोटी ७७ लाख). मस्कावद ते दसनूर गावापर्यंत चा रस्ता सुधारणा करणे (२ कोटी ७१ लाख) आदी गावांचा समावेश आहे.
या मंजूर कामांसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.