Jalgaon : वर्षभरात विद्युत अपघाताच्या 95 घटना; 30 जणांचा मृत्‍यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Take care in the rainy season about Electricity Accident

Jalgaon : वर्षभरात विद्युत अपघाताच्या 95 घटना; 30 जणांचा मृत्‍यू

जळगाव : महावितरणतर्फे वेळोवेळी नागरिकांना विजेपासून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात येत असले, तरी जिल्ह्यात कुठेना कुठे विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्‍याच्‍या घटना घडत आहेत. महावितरणने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षभरात जळगाव जिल्ह्यात ३० व्यक्तींचा व ४२ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच काहीजण जखमी झाल्‍याची देखील नोंद आहे.

पावसाळ्यात वीजयंत्रणेच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक वस्तूंपासून सावध राहणे आवश्यक आहे. परंतु, पावसाळा सुरू झाल्याच्‍या अगोदरपासून वारा व पावसात विद्युत तारा तुटत असतात. तसेच पावसामुळे ओलावा असताना विद्युत प्रवाह लिकेज होऊन शॅाक लागत असतो. यामुळे मृत्‍यूदेखील ओढावले आहेत. अर्थात यात ‘महावितरण’च्या चुकीमुळे काही घटना घडल्या; तर काही घटना या घरातील समस्यांमुळे झाल्या आहेत.

हेही वाचा: खानदेशवासीयांचा जीवनदायिनी तापीला 108 मीटर साडीचा आहेर

९५ विद्युत अपघातांची नोंद

जळगाव जिल्‍ह्यात २१-२२ या वर्षात ९५ विद्युत अपघात झाल्‍याची नोंद आहे. अनेक घटनांची नोंद झालेली नाही. परंतु, महावितरणकडे असलेल्‍या नोंदीतील ९५ विद्युत अपघातात ४२ प्राणी दगावले आहेत. तर ३० नागरिकांचा मृत्यू झाला असून १६ जखमी आहेत.

महावितरण कर्मचाऱ्यानांही शॉक

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण देऊन विजेचे काम करून घेण्यात येते. मात्र, अनेकदा अचानक वीजपुरवठा सुरू होणे किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे महावितरण कर्मचारी विजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटना घडल्‍या आहेत. परंतु, गेल्या वर्षी जळगाव जिल्ह्यात अप्राणांतिक अपघात होऊन महावितरणचे पाच कर्मचारी जखमी झाले आहेत. तर २ बाह्यस्तोत्र कर्मचारी अप्राणांतिक अपघात होऊन जखमी झाले आहेत.

हेही वाचा: जळगाव : रखडलेला उड्डाणपूल, चालकाची डुलकी अन्‌ मृत्यूचा वेग

महावितरणचे आवाहन

पाण्यामुळे ओली झालेली कोणतीही वस्तू वीजवाहक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा किंवा घरगुती उपकरणे तसेच शेतीपंप, स्विच बोर्ड, पत्र्याची घरे, जनावरांचे गोठे आदींपासून वीज अपघात टाळण्यासाठी सदैव सावध व सतर्क राहण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: 30 Deaths In 95 Cases Of Electrical Accidents Jalgaon District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top