महिलेस मावशी म्हटल्याने प्रैाढास बेदम मारहाण | Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beating

महिलेस मावशी म्हटल्याने प्रैाढास बेदम मारहाण

जळगाव : शहरातील स्वातंत्र्य चौकात एका महिलेला मावशी बोलल्याचा रागातून चौघांनी प्रौढ व्यक्तीला बेदम मारहाण करून शिवीगाळ केली.

हेही वाचा: 2 भावंडाना पिंप्राळ्यात मारहाण

धनराज रामकृष्ण वाघ (वय ५५, रा. कंकराळा, ता. सोयगाव, जि.औरंगाबाद) कामानिमित्त सोमवारी (ता. २०) जळगावात आले होते. दुपारी चारला स्वातंत्र्य चौकात औरंगाबादकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत असताना, एका महिलेला त्यांनी मावशी म्हटले. याचा राग आल्याने चारचाकी वाहनात बसलेल्या चौघांनी वाघ यांना मारहाण करून शिवीगाळ केली. धनराज वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक संजय नारखेडे तपास करीत आहे.

हेही वाचा: संगणक अभियंता तरुणीस भररस्त्यात मारहाण; ऍसिड टाकण्याची दिली धमकी

Web Title: 4 Man Beating Adult Due To Insulted Woman In Jalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaoncrimeBeating
go to top