Jalgaon News : शहरात 42 कोटींच्या निधीतील कामे अपूर्णच; 7 रस्तेच पूर्ण

A pothole near Shahunagar Hospital on the road from Ganesh Colony to Court Chowk.
Pit near Nutan Maratha College.
A pothole near Shahunagar Hospital on the road from Ganesh Colony to Court Chowk. Pit near Nutan Maratha College.esakal

Jalgaon News : दोन वर्षांपूर्वी सुरू होऊनही शहरातील ४२ कोटींच्या निधीतून होणाऱ्या डांबरी रस्त्यांची कामे अद्याप अपूर्णच आहेत.

या निधीत जवळपास ४२ लहान-मोठ्या रस्त्यांची कामे समाविष्ट होती. त्यापैकी केवळ सात रस्तेच पूर्ण झाली आहेत. काही रस्त्यांचे बीएम, एमपीएम झाले असून, काही रस्त्यांवरील सीलकोट, कार्पेट बाकी आहे.(42 crore fund works are incomplete in city jalgaon news)

तत्कालीन भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी जाहीर केला होता. तो मिळण्यास विलंब लागल्यानंतर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे सरकार सत्तेत आले.

या सरकारने जळगावातील रस्तेकामांना स्थगिती दिली. नंतरच्या कालखंडात स्थगिती उठविल्यानंतर यापैकी ४२ कोटींच्या निधीतील कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन त्यासंबंधी निविदा प्रक्रिया होऊन कार्यादेश देण्यात आले.

दोन वर्षांपासून काम सुरू

या ४२ कोटींच्या निधीतील कामे सावर्जनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होत असून, स्थानिक मक्तेदार एजन्सीने त्यातून ४२ रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. दोन वर्षांपूर्वीच या कामांना सुरवात होऊनही ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत. यापैकी बऱ्याच रस्त्यांचे काम अर्धवट झालेले आहे.

विभागाच्या दाव्यानुसार सात रस्तेच पूर्ण

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दाव्यानुसार या ४२ रस्त्यांमधील केवळ सात रस्त्यांची कामेच सीलकोट, कार्पेटसह पूर्ण झाली आहेत. तर पाच रस्त्यांची कामे बीएम-कार्पेटसह पूर्ण आहेत, त्यावर सीलकोट बाकी आहे. २५ रस्त्यांची कामे बीएम पातळीपर्यंत पूर्ण आहेत, तर पाच रस्त्यांचे काम ‘एमपीएम’पर्यंत पूर्ण झाले आहे.

A pothole near Shahunagar Hospital on the road from Ganesh Colony to Court Chowk.
Pit near Nutan Maratha College.
Jalgaon News: प्रशासकीय मान्यतेसह कार्यादेश 9 दिवसांत 100 टक्के द्यावेत : आयुष प्रसाद

बारा रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचा एजन्सीचा दावा

दरम्यान, या संदर्भात मक्तेदार एजन्सी श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक आदित्य खटोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ४२ कोटींच्या निधीतील ४२ रस्त्यांच्या कामांपैकी १२ ते १४ रस्त्यांची कामे कार्पेट, सीलकोटसह पूर्ण झाल्याचा दावा केला.

दोन वर्षांपासून ही कामे सुरू केली असली तरी ती सुरू झाली तेव्हा कोरोनाची तिसरी लाट होती, दोन सीझन पावसाळा असल्याने त्या काळात कामे बंद होती. उर्वरित कामेही सुरू असून, दोन महिन्यांत ती पूर्ण होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

नवीन रस्त्यांची दुरवस्था

या रस्त्यांच्या कामापैकी काही रस्त्यांची अल्पावधीतच दुरवस्था झाली आहे. कोर्ट चौक ते गणेश कॉलनीपर्यंतच्या रस्त्याचे सीलकोट झालेले नाही. मात्र, या रस्त्यावर वर्षभरातच काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.

तर काही रस्ते महापालिकेनेच अमृत योजनेची जलवाहिनी दुरुस्तीसाठी, तर काही रस्त्यांवर नागरिक, अथवा काही संस्थांनी नळसंयोजन घेण्यासाठी खोदकाम करून ठेवल्याने ते खराब झाले आहेत.

A pothole near Shahunagar Hospital on the road from Ganesh Colony to Court Chowk.
Pit near Nutan Maratha College.
Jalgaon News: विमानसेवेने अर्थकारण बदलणार, मार्गाचे अडथळेही हटवा; माजी महापौरांचे आयुक्तांना पत्र

''शहरातील ४२ कोटींच्या निधीतील कामे दोन महिन्यांत पूर्ण होतील. मात्र, शासनाकडून झालेल्या कामांच्या मोबदल्यातील देयके दाखल करूनही रक्कम अदा झालेली नाही. त्यामुळे पुढची कामे पूर्ण होण्यात अडचणी येत आहेत.''-आदित्य खटोड संचालक, श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर

A pothole near Shahunagar Hospital on the road from Ganesh Colony to Court Chowk.
Pit near Nutan Maratha College.
Jalgaon News: विमानसेवेने अर्थकारण बदलणार, मार्गाचे अडथळेही हटवा; माजी महापौरांचे आयुक्तांना पत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com