Jalgaon Money Fraud : CDM मशिनमध्ये भरल्या 500च्या बनावट नोटा

Fraud Crime News
Fraud Crime Newsesakal

Jalgaon News : सीडीएम मशिनमध्ये खातेदाराने भरलेल्या पाचशेच्या सहा नोटा बनावट निघाल्याने चोरवड (ता. पारोळा) येथील एकाविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (500 fake notes loaded into CDM machine jalgaon currency fraud crime news)

याबाबत येथील एचडीएफसी बँक शाखेचे व्यवस्थापक जितेंद्र किशोर खरे यांनी फिर्याद दिली, की २९ मेस सायंकाळच्या सुमारास चोरवड (ता. पारोळा) येथील राजू आत्माराम पाटील हे बँकेच्या कॅश डिपॉझिट मशिनद्वारे आपल्या खात्यात भरणा करण्यासाठी आले होते.

त्यावेळी त्यांनी पाचशे रुपयांच्या सहा नोटा सीडीएम मशिनमध्ये भरल्या. परंतु या नोटा खोट्या व बनावट असल्याने त्या खात्यात न जमा होता सीडीएमच्या कॅसेटमध्ये जमा झाल्या. दरम्यान, बँकेचे कॅशिअर तुषार जोशी व रमेश सपकाळे यांनी तपशील तपासला असता या नोटा बनावट आढळून आल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Fraud Crime News
Jalgaon Crime News : अवघ्या 17 मिनिटांत बँक लूटून दरोडेखोर पसार; रक्तबंबाळ बँक मॅनेजरला तिजोरीत कोंडले..!

दोन्ही कर्मचाऱ्यांनी ही बाब तत्काळ व्यवस्थापक खरे यांना सांगितली. त्यानंतर नोटा जमा करणाऱ्या खातेदाराचा खाते क्रमांक तपासला असता तो चोरवड येथील राजू आत्माराम पाटील यांचा निघाल्याने त्यांना बँकेत बोलावून सदरील प्रकार सांगितला.

दरम्यान, पाटील यांनी पैसे भरल्याचे कबूल केले असून, बनावट नोटा आढळल्याप्रकरणी पारोळा पोलिसात राजू पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक योगेश जाधव तपास करीत आहेत.

Fraud Crime News
Jalgaon Accident News : बाजरीच्या पोत्यानं घेतला तरूणाचा जिव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com