Latest Marathi News | खरिपातील 60 टक्के कापूस घरात मात्र भाव मिळेना; खंडीचे दर 1 लाखावरून घरसले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton Rate Decrease

Jalgaon : खरिपातील 60 टक्के कापूस घरात मात्र भाव मिळेना; खंडीचे दर 1 लाखावरून घरसले

जळगाव : खरिपातील सुमारे साठ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात आतापर्यंत आला आहे. त्यातील काही कापूस मिळेल त्या दरात विकून शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केली. मात्र किमान दहा हजारांचा दर मिळावा, यासाठी शेतकरी हव्या त्या प्रमाणात कापूस विक्रीस काढत नसल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या खंडीचे (दोन गाठी) दर एक लाख दहा हजारांवरून ६५ हजारांवर आले आहेत. यामुळे पूर्वी असलेला नऊ हजारांचा दर आता खाली येऊन साडेसात ते आठ हजारांवर आला आहे.

जिल्ह्यात लांबलेल्या पावसाने १०९ टक्के पाउस झाला. गतवर्षी कापसाला १३ हजारांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा ११० टक्के केला. परतीच्या पावसाने काही ठिकाणी कापसाचे मोठे नुकसान झाले, असे असले तरी कपाशीचे यंदा चांगले उत्पादन येत आहे. कापसाचा दर्जाही चांगला आहे.(60 percent of cotton in Kharif not priced Khandi rate Decreased from 1 lakh Jalgaon Agriculture News)

हेही वाचा: Jalgaon : थंडी सुरू होताच उबदार कपडे खरेदीसाठी ग्राहकांची होतय गर्दी

यामुळेच जिनिंग प्रेसिंग असोसिएशनने यंदा २५ ते ३० लाख कापसाच्या गाठी निर्मितीचे उत्पादन घेण्याचे ठरविले आहे. यामुळेच ३० लाख गाठींचे उत्पादन घेण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, परतीच्या पावसाने कपाशीत आर्द्रता निर्माण केली आहे. यामुळे कपाशीचे भाव कमी झाले. सध्या सात ते साडेआठ हजारांचा दर कपाशीला आहे.

गतवर्षी कापसाला मिळालेला १३ हजारांपर्यंतचा दर पाहता यंदा शेतकऱ्यांनी दहा ते पंधरा टक्के पेरा अधिक केला आहे. यामुळे कापसाचे चांगले उत्पादन येणे सुरू झाले आहे. दिवाळीपर्यंत अधिक कापूस बाजारात येण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा: Winter Season : सर्दी,खोकल्याचे रुग्ण वाढले; 3 दिवसांत 200 रुग्णांची तपासणीची नोंद

कापसाला नऊ ते दहा हजारांच्या दराची अपेक्षा असताना दुसरीकडे कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला सध्या मागणी कमी आहे. जर कापसाची आवक वाढली अन् आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजारातील मागणी कमी राहिली तर सध्याच्या दरावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. यामुळेच खंडीचे दर एक लाख दहा हजारांवरून ६५ हजारांवर आले आहेत.

आगामी पंधरा दिवस तरी कापसाचे दर सात ते आठ हजार रुपये असतील. यावर काळजी म्हणून शेतकऱ्यांना कापूस थोडा थोडा करून विकावा लागेल. म्हणजे तोटाही होणार नाही व भाव वाढले तर नुकसान टळेल.

हेही वाचा: Jalgaon : कन्येच्या विवाहाला ‘संस्कारा’ ची जोड; सोहळ्याच्या खर्चातून गोसेवेचा संकल्प

"शेतकऱ्यांचा कापूस घरात आला आहे. सध्या सात ते साडेआठ हजारांचा दर सुरू आहे. पंधरा दिवस असेच चित्र राहील. कापसाच्या दरात वाढ, घट हे आंतरराष्ट्रीय दरावर अवलंबून आहे. कापसाचे उत्पादन यंदा ६ ते १० क्विंटल प्रतिएकरी आले आहे. सरकीचे दरही चार हजारांवरून तीन हजार ४०० वर आले आहेत. शेतकऱ्यांना ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घ्यावी लागेल. मात्र जास्त दिवस कापूस घरात ठेवणेही धोक्याचे आहे."

- प्रदीप जैन, अध्यक्ष जिनिंग प्रेसिंग ओनर्स असोसिएशन

"कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. हंगाम येण्यापूर्वी कापसाला १३ हजारांचा दर मिळाला. अप हंगाम हातात येताच कापसाचे दर आठ ते नऊ हजार झाले, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. गतवर्षी कापूस मिळत नव्हता, तर १३ हजारांचा दर व्यापारी देत हेाते. आता कापूस आला तर भाव पाडू लागले आहेत. हे चुकीचे आहे."

विजय झोपे, शेतकरी

आकडे बोलतात...

* दरवर्षी होणाऱ्या कापसाच्या गाठींचे उत्पादन-- १८ ते २५ लाख गाठी

* गतवर्षी उत्पादित गाठी-- नऊ लाख गाठी

* खंडीला मिळालेला दर- ४० ते ५० हजार

* शेतकऱ्यांना गतवर्षी प्रतिक्विंटल मिळालेला दर- नऊ ते १३ हजार

* सध्याचा दर ७००० ते ८५००

हेही वाचा: Jalgaon : युवकाचा गळा चिरून खून; चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल