मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 74 कोटी मंजूर

Minister Gulabrao Patil
Minister Gulabrao Patilesakal
Updated on

जळगाव : राज्यातील ग्रामीण रस्त्यांसाठी वरदान ठरलेल्या आणि पहिल्या टप्प्यात यशस्वी कार्यान्वयन झालेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला गुरुवारी (ता. १९) मान्यता मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यात या दुसऱ्या टप्यात प्रत्येक वर्षी ५० किलोमीटर असे दोन वर्षात १०० किलोमीटरचे ग्रामीण रस्ते तयार करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून दरवर्षी ३७ कोटी असे एकूण ७४ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

याबाबत माहिती देताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, सदर योजनेचा पहिला टप्पा हा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आलेला असून आता दुसऱ्या टप्प्याला मान्यता मिळाल्याने ग्रामीण भागातील रस्ते खऱ्या अर्थाने कात टाकणार आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यासाठी २०२२-२३ आणि २०२३-२४ या २ वर्षांसाठी प्रत्येकी ५० अशा एकूण १०० किलोमीटरच्या रस्त्यांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी ३७ कोटी अशा एकूण ७४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या योजनेच्या संपूर्ण म्हणजेच ३६९ किलोमीटरच्या कार्यान्वयनासाठी २७७ कोटी ५० लाख रूपयांचा निधी लागणार आहे.

Minister Gulabrao Patil
जळगाव : किरणा दुकानदारास दीड लाखांचा चुना

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते दर्जोन्नत करण्यासाठीच्या निवडीसह कार्यान्वयनासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण करण्यात येणार आहे. या समितीचे सदस्य सचिव हे महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेचे (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) कार्यकारी अभियंता असतील. तर या समितीत पालकमंत्र्यांनी नियुक्त केलेले २ विधानसभा सदस्य तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक अभियानाचे विभागीय अधिक्षक अभियंता हे सदस्य म्हणून असणार आहेत. या समितीच्या माध्यमातूनच जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यान्वयन होणार आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या

Minister Gulabrao Patil
विहिरीजवळ पाण्यासाठी गेले अन् सर्पदंशाने घेतला प्राण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra government decides to conduct 'e-Peek Pahani' through appointed assistants from July 15
Khandesh Expressway latest update
ACB Nashik bribery trap operation
Maharashtra cotton sowing delayed due to low rainfall
Marathi News Esakal
www.esakal.com