Jalgaon Crime News : मुलींवर अत्याचारप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

Accused sentenced to life imprisonment in rape case jalgaon crime news
Accused sentenced to life imprisonment in rape case jalgaon crime newsesakal

अमळनेर (जि. जळगाव) : नैसर्गिक विधीसाठी जाणाऱ्या दोघा आदिवासी मुलींवर अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील आरोपीला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. (Accused sentenced to life imprisonment in rape case jalgaon crime news)

वैजापूर येथील तीन लहान आदिवासी मुली १३ ऑगस्ट २०१९ ला रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान नैसर्गिक विधीसाठी जात असताना तेथीलच देवेंद्र राजेंद्र भोई (मोरे) (वय २४) याने त्यांचा रस्ता अडवून हात ओढला. एक मुलगी पळून गेली. मात्र दोन मुलींना मोटरसायकलवर बसवून त्याने त्यांच्यावर अत्याचार केला.

मुलींचे ओरडणे ऐकून पालक येताच देवेंद्र पळून गेला. देवेंद्रविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी देवेंद्रला अटक करण्यात आली होती. हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील ॲड. राजेंद्र चौधरी यांनी १९ साक्षीदार तपासले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Accused sentenced to life imprisonment in rape case jalgaon crime news
Jalgaon Crime News : 47 हजारांच्या गुटख्यासह एकाला अटक

डॉक्टरांची साक्ष आणि डीएनए रिपोर्ट ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्या. पी. आर. चौधरी यांनी आरोपी देवेंद्र यास बाललैंगिक अत्याचार पोक्सो कायदा तसेच भादंवि कलम ३७६ व कलम ३७६ अ प्रमाणे नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

तसेच कलम ३६३ प्रमाणे सात वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. पोलिस कर्मचारी उदयसिंग साळुंखे यांनी पैरवी अधिकारी, हिरालाल पाटील यांनी केस वॉच म्हणून काम पाहिले. पोलिस कर्मचारी गणेश चौधरी, राहुल रणधीर यांनी सहकार्य केले.

Accused sentenced to life imprisonment in rape case jalgaon crime news
Jalgaon News : फुटीरांशी आम्ही लढायचे, तुम्ही जवळ घ्यायचे! प्रदेशाध्यक्ष पाटलांसमोर संतप्त भावना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com