adani
adanieSakal

Adani Crisis : जळगावात 150 कोटींचा फटका; गुंतवणूकदारांचे वेट ॲन्ड वॉच!

जळगाव : हिंडेनबर्गच्या कथित अहवालानंतर जगातील तिसऱ्या व भारतातील पहिल्या श्रीमंत कंपनी अदानी ग्रुपच्या शेअर्सचे (Share) भाव कमालीचे कोसळले आणि त्याचा लाखो गुंतवणूकदारांना अब्जावधींचा फटका बसला. (Adani Group share price plummeted costing millions of investors billions jalgaon news)

जळगाव जिल्ह्यातही सुमारे १५० कोटींच्या गुंतवणुकीला फटका बसल्याचे सांगण्यात येतेय. सध्याच्या या स्थितीमुळे शेअर बाजारात निराशेचे व नकारात्मक वातावरण असून, अदानींच्या कंपनीतील गुंतवणूकदार ‘वेट ॲन्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत.

सध्या अदानींच्या कंपन्यांच्या समभागातील चढ-उतारावर दीर्घकाळ लक्ष ठेऊन मगच समभाग विकण्या किंवा खरेदीबद्दल निर्णय घेणे योग्य राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्यातरी अदानींशी संबंधित कंपनीत गुंतवणूक करणे टाळणेच उचित ठरेल, असा सल्लाही तज्ज्ञांकडून दिला जातोय.

जळगावातही पडसाद

गेल्या काही वर्षांत अदानी समुहाची प्रगती बघता लाखो ग्राहकांनी या समूहाच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. बघता बघता अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी, तर भारतात अंबानींना मागे टाकून पहिल्या स्थानी पोचले. हिंडेनबर्गने जारी केलेल्या अहवालामुळे अदानी ग्रुपमधील कंपन्यांच्या समभागाचे दर एका रात्रीतून आपटले.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

adani
Jalgaon News : यात्रेकरूंच्या बसला ओडीसा बॉर्डरजवळ अपघात; जिल्ह्यातील 31 यात्रेकरूंचा समावेश

हा ‘क्रायसिस’ अभूतपूर्व होता. त्यामुळे या ग्राहकांचे एकाच रात्रीतून अब्जावधी रुपये बुडाले. जळगाव जिल्ह्यातही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे त्याचे पडसाद इथेही उमटले. जवळपास दीडशे कोटींचा फटका जळगाव जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना बसल्याचे मानले जात आहे.

तज्ज्ञांचा कानमंत्र

-‘अदानी’तील गुंतवणुकीबाबत सध्या ‘वेट ॲन्ड वॉच’

-काही महिन्यांचा काळ जाऊ द्या, अभ्यास करा मगच अदानी समुहाचे शेअर खरेदी किंवा विक्री करा

-सध्या मार्केटची स्थिती नकारात्मक व भीतीदायक. मात्र, अन्य कंपन्यांची स्थिती पाहून त्यांचे समभाग घ्यायला हरकत नाही

-आयटी, फार्मा कंपन्यांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद आहे. त्यामुळे या कंपन्यांमधील समभाग घेण्यावर विचार करावा

तज्ज्ञ काय म्हणतात...

मार्केटमधील एन्ट्री, एक्झिट अभ्यासावी

"अदानी ग्रुप समभागाच्या दरातील चढता आलेख गेल्या काही महिन्यांत पाचवेळा बघायला मिळाला. त्यामुळे त्याकडे बऱ्यापैकी ग्राहक आकर्षित झाले. एखाद्या समुहाचे समभागाचे दर खूप वाढत असले, तर त्यातही ‘डाउनफॉल’ येतोच, पण तो इतका मोठ्या प्रमाणात येईल, याची शक्यता नव्हती. दुर्दैवाने तो आला आणि अनेकांचे मोठे उत्पन्न बुडाले.

adani
Jalgaon News : चोरीच्या गुन्ह्यातील फरारी संशयित अटकेत

मात्र, आम्ही शिक्षित, प्रशिक्षित केलेल्यांना ते शेअर्स कधी काढायचे, हे माहीत असल्याने आमच्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले नाही. कुणाचे झाले असेल, तर तुलनेने खूप कमी झाले. त्यामुळे मार्केटमध्ये गुंतवणूक करताना कधी करायची यासोबत कधी बाहेर पडायचे, हेही आम्ही तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे समजावून सांगत असतो.

शेअर्सचे भाव पडले, की खरेदीची संधी असते, हे खरे असले तरी अदानी समुहाचे समभाग घेण्याची ही वेळ नक्कीच नाही. काही महिन्यांचा काळ जाऊ द्यावा लागेल, मार्केटवर लक्ष ठेवून योग्यवेळी गुंतवणूक करणेच योग्य ठरेल." -किरण जाधव, तज्ज्ञ विश्‍लेषक

अभ्यास करूनच निर्णय घेणे योग्य

"अदानी समुहातील कंपन्या गुंतवणुकीसाठी चांगल्या आहेत, की नाही त्याचे उत्तर नक्कीच ‘चांगल्या’ असे राहील. मात्र, सध्या या समुहातील समभागांचे भाव कोसळणे अनपेक्षित व धक्कादायक आहे. आता हे इतक्या खाली गेलेले दर पुन्हा उसळी किती दिवसांत व कधी घेतील, हे सांगणे कठीण आहे. त्यासाठी वाट बघावी लागेल.

adani
BHR Scam Update : संचालक, अवसायक, कर्जदार आता खंडणीचा गुन्हा; गुन्ह्यांची मालिका सुरूच

यादरम्यान मार्केटवर लक्ष ठेवून, नियमितपणे चार्ट बघून त्याचा अभ्यास करून कुठे गुंतवणूक करावी, कुठून काढावी याबाबत योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. शेअर खरेदीची योग्य वेळ असते तशी ती विकण्याचीही अचूक वेळ शोधता आली पाहिजे. त्यासाठी अभ्यासच आवश्‍यक आहे." -ज्ञानेश्‍वर बढे, संचालक, सद्‌गुरु इन्व्हेस्टमेंट

नकारात्मक वेळही संधीच

"अदानी क्रायसिस’वरून केवळ अदानींच्या नव्हे, तर अन्य कंपन्यांच्या मार्केटवरही थोडाफार परिणाम होत असतो. अदानी समुहावरही तो होईलच. मात्र, त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर वगैरे परिणाम होणार नाही. त्यात काही गैरमार्गाने झाले असेल, तर त्याची चौकशीही होईल. मात्र, मार्केटमध्ये नकारात्मक स्थिती व भीती निर्माण झाली, हे खरे आहे.

सध्या अदानींवरील संकट ‘पॉलिटिकल ड्रीव्हन’ वाटते. मार्चअखेर ते वार्षिक अहवाल सादर करतील. आगामी वर्ष निवडणुकांचे आहे. त्यामुळे या काळात अभ्यास करून योग्य निर्णय गुंतवणूकदारांना घेता येईल. मार्केटमधील सध्याची नकारात्मक स्थिती ‘संधी’ ठरू शकेल. कारण अर्थसंकल्पात आयटी व फार्मा सेक्टरसाठी विशेष तरतुदी असल्याने या कंपन्यांचे शेअर्स घेणे लाभदायक ठरू शकते." -सुरेश बंब, तज्ज्ञ अभ्यासक

adani
Jalgaon News : मुक्ताईनगर येथे 16 मोटारसायकली जप्त; मुंबईच्या पोलिस पथकाने केली कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com