Jalgaon Municipality News : नवीन नळजोडणीसाठी एजन्सी नियुक्त करणार

नवीन आठशे नळ जोडण्यांसाठी महापालिकेकडून एजन्सी नियुक्त करण्यात येणार.
agency will be appointed by Municipal Corporation to connect 800 new taps jalgaon news
agency will be appointed by Municipal Corporation to connect 800 new taps jalgaon newsesakal

Jalgaon Municipality News : शहरात तब्बल ८० हजार नळ जोडण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र अद्यापही काही जणांकडून जोडणीची मागणी होत आहे. त्यामुळे नवीन आठशे नळ जोडण्यांसाठी महापालिकेकडून एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे.

मार्चनंतर पुन्हा शहरातील नळकनेक्शनची मागणी लक्षात घेऊन नवीन निविदा काढली जाणार आहे. (agency will be appointed by Municipal Corporation to connect 800 new taps jalgaon news)

अमृत योजनेचा पहिला टप्पा पूर्णत्वास आहे. शिवाजी नगर भागातील रेल्वे क्रॉसिंगमुळे काही प्रमाणात काम थांबले होते. येत्या दोन दिवसांत ते काम सुरु होणार आहे.

शहरातील ८० हजार नळकनेक्शन अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झाले असून अजून नवीन बांधकाम झालेल्या मालमत्ताधारकांकडून नळ कनेक्शनची मागणी होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून ८०० नळकनेक्शन जोडणीसाठी निविदा राबविण्यात येत आहे.

यासाठी स्वतंत्र मक्तेदार नियुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरात अमृत योजनेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे, मात्र पहिल्या टप्पा पूर्ण करून त्याची नळजोडणीही होणार आहे.

agency will be appointed by Municipal Corporation to connect 800 new taps jalgaon news
Jalgaon Municipality News : बेशिस्त वाहन धारकांविरोधात कारवाईचा बडगा

अनेक भागात नवीन जोडणीचे पाइप काढले आहेत. परंतु नागरिकांनी त्याची मुख्य जोडणी केलेली नाही. त्यामुळे अनेक भागात नवीन अमृतच्या कनेक्शनला व जुन्या नळ कनेक्शनला पाणी सोडण्यात येत आहे.

शिवाजी नगरातील रेल्वे क्रॉसिंग भागात जलवाहिनी टाकल्यानंतर या भागात नळजोडणी करण्यात येईल आणि पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होईल.

त्यानंतर जुन्या जोडणीवरून पाणी सोडणे बंद करून अमृत योजनेद्वारे पाणी सोडणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

agency will be appointed by Municipal Corporation to connect 800 new taps jalgaon news
Jalgaon News : फेब्रुवारीत जिल्हा महासंस्कृती महोत्सव; 5 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com