Market Committee Election : जामनेरला महाविकास आघाडीची कसोटी; 15 वर्षांपासून भाजपची सत्ता!

Mahavikas Aghadi and BJP
Mahavikas Aghadi and BJPesakal

जामनेर (जि. जळगाव) : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Market Committee) आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोमाने तयारी सुरू असून, पुन्हा एकदा येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीचीच चांगली कसोटी लागणार आहे. (Agricultural Produce Market Committee Maha Vikas Aghadi will face good test for upcoming election jalgaon news)

कारण गेल्या पंधरा वर्षांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. ‘सहकारात राजकारण नको’ या गोंडस नावाखाली राज्यसभेचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या जामनेर तालुक्यातील उरल्या-सुरल्या गटाने भारतीय जनता पक्षाशी आधीच जुळवून घेतले आहे.

शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर तालुक्यात अनेक घडामोडी सुरू आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर पाटील यांनी त्यांचा सहकार्यांसह नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर युवा सेनेचे ॲड. भरत पवार यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात जाणे पसंत केले.

आता तालुक्यात थोडीफार शिल्लक असलेली उद्धव ठाकरेंची सेना- राष्ट्रीय काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीतील घटक पक्षांची बाजार समितीच्या निवडणुकीत कशी मोट बांधता हे पाहाणे लक्षवेधी ठरणार आहे.

तसे पाहिले तर तालुक्यातील महत्त्वाच्या बहुतांश सहकारी संस्थांवर भारतीय जनता पक्षाची किंवा त्यांच्या समर्थकांचीच सत्ता आहे. ऐंशी-नव्वद टक्क्यांहून जास्त ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच आहेत. याचाही लाभ येत्या निवडणुकीत भाजपलाच होणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जाते.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Mahavikas Aghadi and BJP
Jalgaon News : डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बालकाचा गँगरीनने दुर्दैवी मृत्यू! तीन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल

सुमारे तीन हजार मतदार

तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ संचालकांसाठी मतदान प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू होणार असून, त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. बाजार समितीच्या आगामी निवडणुकीसाठी एकूण २ हजार ९१४ पात्र मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

या मध्ये ९४ सहकारी विकास संस्था मतदारसंघातून सर्वात जास्त म्हणजे ११ जागांसाठी १ हजार १७७ मतदार आहेत तर ४ जागांसाठी १०६ ग्रामपंचायतींमधून १ हजार २७ मतदार आणि व्यापारी मतदारसंघामधून २ जागांसाठी ५९२ मतदार तर हमाल-मापारी मतदार संघातून एका जागेसाठी एकूण ११८ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

कमीत कमी १० आर शेती असलेल्या शेतकऱ्यालाही प्रथमच उमेदवारी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, हे येथे उल्लेखनीय. पहिल्या टप्प्यात म्हणजे २८ एप्रिलला मतदान होणार असून, २९ एप्रिलला सकाळी मतमोजणी होईल.

आगामी काळात तालुक्यातील जिल्हा परिषद- पंचायत समितीच्याही निवडणुका लागणार असल्याने बाजार समितीच्या निवडणुकीला चांगलेच महत्व प्राप्त झाले. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या बैठकांवर-बैठका सुरू झाल्या आहेत.

Mahavikas Aghadi and BJP
BJP Vs Shivsena : दिल्ली दूर...! बाजार समितीच्या गल्लीतच ‘युती’ला फुटीचे फटाके...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com