Jalgaon Ajit Pawar : महायुतीच्या माध्यमातून जनतेच्या विकासाची कामे करा : अजित पवार

Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

Jalgaon Ajit Pawar : राज्यात महायुती होण्याअगोदर जळगाव जिल्हा बँके,धरणगाव बाजार समितीत तीन पक्षाची महायुती झाली होती.

आता हीच महायुती टिकवून ठेवून जिल्ह्यात जनतेची विकासाची कामे करा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. (Ajit Pawar statement about Do people development work through Mahayuti jalgaon news)

जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार यांनी जळगाव दौऱ्यात त्यांची भेट घेऊन चर्चा केली.

धुळे येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव विमानतळावर उतरून मोटारीने धुळ्याकडे गेले होते.

कार्यक्रम झाल्यावर सायंकाळी धुळे येथून मोटारीने ते जळगाव विमानतळावर आले होते. त्यावेळी संजय पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ajit Pawar
Ajit Pawar : कोण आहेत श्रीनिवास पवार? अजित पवार का घेतात त्यांचा सल्ला, जाणून घ्या

यावेळी संजय पवार म्हणाले कि, राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी कॉग्रेस यांची महायुती होण्याअगोदर ती जळगाव जिल्ह्यात झाली होती.जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष निवडीत तर धरणगाव बाजार समिती संचालक निवडीतही महायुती झाली होती.

त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कि आता ही महायुती टिकवून ठेवा आणि जनतेच्या विकासाची कामे करा. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार लताताई सोनवणे, जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम उपस्थित होते.

Ajit Pawar
Ajit Pawar Latest Update : '…तर अजित पवार नक्की मुख्यमंत्री होतील', भाजपाच्या माजी खासदाराचं वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com