H3N2 Flu : एच३एन२बाबत सतर्कतेचे आदेश; हे आहे प्रतिबंधात्मक उपाय... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Flu H3N2

H3N2 Flu : एच३एन२बाबत सतर्कतेचे आदेश; हे आहे प्रतिबंधात्मक उपाय...

जळगाव : ‘एच३एन२’ (इन्फ्लूएंझा) (H3N2) या कोरोनाच्या नव्या संसर्गाबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेने सज्ज राहण्याचा इशारा सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिला आहे. महापालिका, पालिका, ग्रामीण रुग्णालयात या आजाराच्या रुग्णांसाठी वेगळा कक्ष, स्टाफ, औषधसाठा तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Alert orders regarding H3N2 flu by Department of Public Health jalgaon news)

अलर्टच्या इशाऱ्यामुळे शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (जीएमसी) अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आरेाग्य विभागाच्या सूचनांबाबत माहिती दिली. जिल्हा रुग्णालय व शासकीय महाविद्यालयात एक प्रकारच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याविषयी सांगितले. सोबतच डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, इतर स्टाफ, औषधसाठा तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या.

असा पसरतो ताप

*व्यक्तींकडून व्यक्तीला

*खोकणे, शिंकणे, श्वासाद्वारे

*हातावर पडलेले थेंब

या नागरिकांना आहे अधिक धोका...

*ज्येष्ठ नागरिक, लहान बाळ

*गर्भवती महिला

*रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या व्यक्ती

या आजाराची लक्षणे अशी

*ताप येणे, डोकेदुखी

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

*अंगदुखी, खोकला, नाक गळणे

*घशाला खवखव, घसादुखी

प्रतिबंधात्मक उपाय असे

*वारंवार साबणाने हात धुवा

*पौष्टिक आहार घ्या

*लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री खा

*हिरव्या पालेभाज्यांचा वापर करा

*धूम्रपान टाळा

*पुरेशी झोप घ्या, भरपूर पाणी प्या

हे करू नका..

*हस्तांदोलन टाळा

*डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेऊ नका

*फ्लूसदृश लक्षणं दिसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका

"‘एच३एन २’ (इन्फ्लूएंझा) संसर्गजन्य आजार आहे. जिल्ह्यात याचे रुग्ण नाहीत. ताप येताच नागरिकांनी तोंडाला मास्क वापरून, हस्तांदोलन टाळावे, गर्दीत जाणे टाळावे. तपासणी करून लवकर उपचार करावेत." -डॉ. मारोती पोटे, उपअधिष्ठा०ता (जीएमसी)