नाल्यात आढळला अनोळखी मृतदेह; पिंप्राळ्यातील घटना

While taking the abandoned body found in the drain to the hospital.
While taking the abandoned body found in the drain to the hospital.esakal

जळगाव : पिंप्राळा परिसरातील केदारनगरातील खोल नाल्यात शुक्रवारी (ता. २२) एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. या व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असावे, असा अंदाज आहे.

रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून यामागे घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. (An unidentified body was found in the drain Incident in Pimprala jalgaon Latest marathi news)

While taking the abandoned body found in the drain to the hospital.
Nashik : अर्धवट कामामुळे जागोजागी चिखलाचे साम्राज्य

केदारनगरातील एका नागरिकास सकाळी ९ वाजेच्या सुमारास नाल्यात मृतदेह दिसून आला. त्याने नगरसेवक अतुल बारी यांना कळविले. त्यांनी रामानंदनगर पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली.

अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी आले. मृतदेह गेल्या चार ते पाच दिवसांपासूनचा असावा, अशा कुजलेल्या अवस्थेत होता.

नाल्याच्या पाण्यात मृतदेह वाहून आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी नाल्यातून मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. कुजलेला असल्याने तोपर्यंत मृतदेहाचे शीर धडापासून गळून वेगळे झाले होते. घातपाताच्या अनुषंगानेही पोलिस तपास करीत आहेत.

While taking the abandoned body found in the drain to the hospital.
आमदार सुहास कांदे यांच्यासाठी ‘मातोश्री’चे दरवाजे खुले : आदित्य ठाकरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com