अमळनेरला कोट्यवधींच्या कामांना मंजुरी; विशेष रस्ता अनुदानातून कामे

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून शहरातील विकासकामांसाठी सुमारे ५ कोटींवर निधीस मंजुरी मिळाली आहे.
cm Uddhav Thackeray
cm Uddhav Thackerayesakal

अमळनेर : येथील आमदार अनिल पाटील यांच्या अथक प्रयत्नाने ग्रामीण भागात विकासाची घोडदौड सुरू असताना शहराला देखील तेवढेच झुकते माप देण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून त्यांनी शहरातील विकासकामांसाठी सुमारे ५ कोटींवर निधीस मंजुरी मिळवली आहे.

अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजना तसेच विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत निधी प्राप्त झाला आहे. आमदार पाटील यांनी या आधी देखील मोठा निधी अमळनेर नगरपरिषदेस मिळवून दिला असल्याने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान नूतनीकरण तसेच अनेक प्रभागात सामाजिक सभागृह व रस्ते, सुशोभीकरण अशी भरीव कामे होत आहेत.

cm Uddhav Thackeray
जळगाव : शिवाजीनगर रस्ताही मक्तेदाराच्या तिढ्यात; मनपा प्रशासन हतबल

ही आहेत मंजूर कामे

वैशिट्यपूर्ण योजना आणि विशेष रस्ता अनुदान योजनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १६ मध्ये भास्कर चव्हाण यांच्या घरापासून (पिठाची गिरणी) ते बापुजी भिका महाजन यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (२० लाख), प्रभाग २ अंतर्गत गुलाब पाटील ते सानेनगर रस्ता ट्रीमिक्स काँक्रिटीकरण (३० लाख), बालाजी स्टील ते श्री भद्राप्रतिक मॉलपर्यंत रस्ता मजबुतीकरण, रुंदीकरण व डांबरीकरण गटारीसह (५० लाख), मंगलमूर्ती पतपेढी ते रेल्वेस्थानक उड्डाणपुलापर्यंत रस्ता रुंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण, गटारी (५० लाख), प्रभाग ३ मध्ये रस्ते ट्रीमिक्स काँक्रिटीकरण (३० लाख), प्रभाग १३ बालाजीपुरामधील रस्ते ट्रीमिक्स काँक्रिटीकरण (३० लाख), तसेच प्रभाग १४ मध्ये आर. के. नगर भागात अंतर्गत रस्ते गटारीसह ट्रीमिक्स काँक्रिटीकरण (60 लाख) आणि बहादरपूर नाक्याजवळ मुस्लिम कब्रस्थानचे कंपाउंड आणि सुशोभीकरण (३० लाख), छत्रपती शिवाजी महाराज उद्यान विकसित करणे (३० लाख), ढेकूरोडवर अभ्यासिकेचे बांधकाम (२ कोटी) अशी भरीव विकासकामे आमदारांनी मंजूर केली आहेत.


महत्त्वपूर्ण कामे लावली मार्गी

महत्त्वपूर्ण रस्त्यांची कामे आमदारांनी मार्गी लावली आहे. भद्राप्रतिक मॉलजवळील प्रताप महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता आमदारांनी मार्गी लावला आहे. या व्यतिरिक्त मंगलमूर्ती पतपेढीकडून रेल्वेस्थानक मार्गे उड्डाणपुलास जोडणारा रस्त्यासही मंजुरी मिळवून दिली. शिवाजी उद्यानास आधीचे ५० लाख वगळता अजून ३० लाख वाढीव निधी दिला. ढेकूरोडवर सुमारे २ कोटी निधीतून अभ्यासिका होणार आहे. जवळपास सर्वच प्रभागास न्याय देण्याचा प्रयत्न दिसत असून, अजून काही प्रभागात प्रस्तावित कामे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी देत येणाऱ्या काळात आपल्या शहराचे रूप पूर्णपणे बदललेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या निधीस मंजुरी दिल्याबद्दल आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे शहरातील जनतेच्या वतीने विशेष आभार व्यक्त केले आहेत.

cm Uddhav Thackeray
वडिलांनी मारलं म्हणून १३ वर्षाच्या मुलानं चिमुकलीचा घेतला जीव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com