जाणारा प्रत्येक दिवस शिंदे गटासाठी तापदायक : नंदकिशोर जकातदार | Latest Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde and Uddhav Thackeray

जाणारा प्रत्येक दिवस शिंदे गटासाठी तापदायक : नंदकिशोर जकातदार

भडगाव (जि. जळगाव) : मंगळ आणि शुक्र एकत्र असल्यामुळे २ जुलैनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) अविश्वास आल्यास काहीप्रमाणात महाविकास आघाडीच्या फायद्याचा ठरू शकतो. मात्र येत्या चार दिवसांत अविश्वास प्रस्ताव आल्यास ठाकरे सरकारसाठी ते अवघड ठरेल. शिवाय बंडखोर शिंदे गटासाठी जाणारा प्रत्येक दिवस तापदायक ठरेल, असे प्रख्यात ज्योतिषी तथा बृहन महाराष्ट्र ज्योतीष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी सध्याच्या ग्रहमान स्थितीनुसार स्पष्ट केले. राज्याला स्थिर सरकार १२ ते १८ जुलै दरम्यान लाभेल, असेही त्यांनी सांगितले. 

१६ मार्चपासून राज्य सरकारवर अनिष्टता होती. तिचा आता स्फोट झाला. १८ जुलैपर्यत राज्याच्या राजकारणात पुन्हा स्थिरता येऊ शकते. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात शेवटपर्यंत लढा राहिल, असे मत प्रख्यात ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: किशोर आप्पा परत या..! उपजिल्हाप्रमुखाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल

२ जुलैनंतर चित्र स्पष्ट होईल

रवि मिथुन राशीत, मंगळ मेष राशीत, शनी कुंभ राशीत वक्रीत तर महाराष्ट्राची रास धनु, तर स्वामी मीन राशीत असल्याने राज्य सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. मात्र १२-१८ जुलै दरम्यान राज्य सरकारमध्ये स्थिरता येऊ शकते. मात्र २ जुलैपासून चित्र अधिक स्पष्ट होईल, असे जकातदार यांनी सांगितले.

तिघांचे ग्रहस्थितीत राजयोग

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ग्रहमान स्थिती उत्तम आहे. तर शिवसेनेतून बंड केलेले मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ग्रह स्थितीत देखील राजयोग आहे. याशिवाय भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सध्याची ग्रहमान स्थिती उत्तम असल्याचे नंदकिशोर जकातदार यांनी सांगितले. त्यामुळे या तिघांमध्ये राजयोग प्रत्यक्षात कोणाच्या वाट्याला येतो, हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

पवारांचा मंगळ लाभदायक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कुंडलीप्रमाणे मेष राष आहे. सध्य मेष राषीला मंगळ आहे. मात्र, हा मंगळ लाभदायी असून सध्याच्या सत्ता पटलावर त्यांची महत्वाची भूमिका आहे. ते पुढच्या काही दिवसांत या सत्ताकारणाच्या पेचात अधिक सक्रिय होतील, असे नंदकिशोर जकातदार यांनी सांगितले. ते सक्रिय राहिल्यास काही महत्वाच्या उलथापालथी होतील, असेही जकातदार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: राजकीय खेळी पूर्ण, न्यायालयीन निकालाची प्रतीक्षा : चिमणराव पाटील

Web Title: Astrologer Nandkishore Jakatdar Predict About Eknath Shinde And Uddhav Thackeray And Current Politics Situations Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..