Jalgaon Crime : महिला मंडलाधिकाऱ्यास जिवे मारण्याचा प्रयत्न; अवैध वाळू वाहतूकदाराची मुजोरी

Jalgaon Crime : महिला मंडलाधिकाऱ्यास जिवे मारण्याचा प्रयत्न; अवैध वाळू वाहतूकदाराची मुजोरी

Jalgaon Crime : अवैध वाळू वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकातील पर्यवेक्षक तथा मंडलाधिकारी बबिता सुधाकर चौधरी यांना अवैध वाळूमाफियांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

वडोदा गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला थांबविले असता ते सोडविण्यासाठी मंडलाधिकारी बबिता चौधरी यांना ट्रॅक्टरवरून त्यांचा हात पकडून खाली खेचल्याने त्या रस्त्यावर पडल्या. हाताला मार लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत. (Attempt to kill female board officer jalgaon crime news)

दरम्यान, घटनेनंतर वाळूमाफिया ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. यावरून चालकासह दोघांवर शासकीय कामकाजात अडथळ्यासह विनयभंगाचा गुन्हा येथील पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. ३१) दुपारी चारच्या सुमारास घडली.

मंडलाधिकारी चौधरी यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मला पर्यवेक्षक म्हणून थोरगव्हाण येथे नियुक्ती दिली असल्याने गुरुवारी मी तेथे कर्तव्यावर जात असताना वडोदा गावाजवळ शिरसाड गावाकडे जात असलेले स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर दिसल्याने मी त्या ट्रॅक्टरला थांबवून तपासणी केली असता त्यात चार हजार ४५७ रुपयांची एक ब्रास वाळू आढळून आली.

ट्रॅक्टरचालकाकडे वाळू वाहतुकीबाबत परवान्याची मागणी केली, तसेच वाहन मालकाची चौकशी केली असता परवाना नसल्याचे चालकाने सांगितल्याने त्यास मी खाली उतरावयास सांगून स्वतः ट्रॅक्टरवर बसले. तेव्हा त्या चालकाने कोणास तरी मोबाईल लावला. थोड्या वेळाने तेथे दोन अनोळखी व्यक्ती आले असता त्यांनी मला ट्रॅक्टरवरून खाली उतरण्यास सांगून ट्रॅक्टर सोडण्यास सांगितले.

तेव्हा मी त्यांना कारवाई करणार असल्याचे सांगितले. तेव्हा त्यातील एकाने माझ्या उजव्या हाताचे मनगट पकडून ट्रॅक्टरखाली ओढले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Crime : महिला मंडलाधिकाऱ्यास जिवे मारण्याचा प्रयत्न; अवैध वाळू वाहतूकदाराची मुजोरी
Bhusawal Crime News: तिहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरलं, एका रात्रीत सख्या भावांसह तिघांचा खून

पडल्याने रस्त्याचा मार लागल्याने माझ्या हाताला जखम झाली आहे व मला ठार करण्याची धमकी देऊन ट्रॅक्टर घेऊन ते पसार झाले.

माझा हात पकडून खाली ओढणाऱ्याचे नाव नीलेश समाधान सोनवणे (रा. थोरगव्हाण, ता. यावल) असल्याचे समजल्यावरून त्याच्यासह अनोळखी चालकाविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

तलाठी संघटनेचे कामबंद आंदोलन

दोन महिन्यांपूर्वीही सकाळी अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला होता. त्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलनही केले होते. तालुक्यात वारंवार अवैध वाळू वाहतूकदारांकडून घडत असलेल्या या घटनांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांत घबराट निर्माण झाली आहे.

दरम्यान, तलाठी संघटनेने घटनेच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन पुकारले. जोपर्यंत आरोपींना अटक करून कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : महिला मंडलाधिकाऱ्यास जिवे मारण्याचा प्रयत्न; अवैध वाळू वाहतूकदाराची मुजोरी
Jalgaon Crime : संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com