जळगाव : जिल्ह्यात पीकविम्याकडे पाठ

Farmers crop insurance scheme latest marathi news
Farmers crop insurance scheme latest marathi newsesakal

जळगाव : गतवर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे यंदा पीक विमाधारक शेतकऱ्यांची संख्या वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु यावर्षी नेहमीपेक्षा कमी म्हणजे केवळ २२ टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदणी केली आहे.

७८ टक्के शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरविली आहे. २२ टक्के शेतकऱ्यांनी १ लाख ३७ हजार क्षेत्र पीक विम्याने संरक्षित केले आहे. नुकसान होऊनही भरपाईबाबत विमा कंपन्यांकडून होणारी चालढकल याला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. (Back to crop insurance in district by farmers Jalgaon Latest Marathi News)

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विमा काढण्यासाठी १ ऑगस्टअखेरपर्यंत मुदत होती. त्यासाठी ई-सेवा केंद्रासह बँकांनाही परवानगी दिलेली होती. विमा काढण्याची मुदत आता संपली असून कृषी विभागाने सर्व बँका, ई-सेवा केंद्रांकडील संपूर्ण माहिती मागविली आहे.

जिल्ह्यातील खातेदार शेतकऱ्यांपैकी अवघ्या २२ टक्के शेतकऱ्यांनी १ लाख ३७ हजार ६६ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पीक संरक्षित केले आहे. गेल्यावर्षी सरासरी २४ टक्के तर तीन-चार वर्षांपूर्वी २६ टक्क्यांवर शेतकऱ्यांनी पीक संरक्षित केले होते. जिल्ह्यात यंदा ८८ टक्के शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

जिल्हयात साडेआठ लाख हेक्टरवर कृषिक्षेत्र असून आठ ‘अ’ नुसार ६ लाख ४६ हजार ४०० शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी ऊस बागायत लागवड क्षेत्र वगळता अन्य ७ लाख ७० हजार ८७४ हेक्टरवर खरीप पेरणी झाली आहे.

पीक विमा योजनेचा राज्य सरकारकडून गाजावाजा करूनही यावर्षी अवघ्या १ लाख ४२ हजार ५१९ शेतकऱ्यांनी १ लाख ३७ हजार ६६ हेक्टरवरील खरीप पीक विमा घेतला आहे. यात पीक विमा घेतलेल्यांनी २४ कोटी ७४ लाख ८ हजार ७२८ रुपये शेतकरी हिस्सा रकमेचा भरणा केला आहे. ७८ टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेपासून लांबच रहाणे पसंत केले असल्याचे दिसून येते.

Farmers crop insurance scheme latest marathi news
चंदुकाका सराफ अँड सन्सच्यावतीने सोन्याच्या खरेदीसाठी ‘E- Gold App’

विम्याचा आलेख घसरता

२०१८ ते २०२२ दरम्यान तीन-चार वर्षांत सरासरी पहाता हा आलेख चढता असण्याऐवजी उतरता आहे. २०१८-१९ मध्ये २६ टक्क्यांच्या जवळपास शेतकरी नोंदणी होती. २०२१ मध्ये २४ टक्के तर यावर्षी फक्त २२ टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा कवच घेतले आहे. पीक विमा कंपन्यांची मनमानी आणि विम्याच्या भरपाईसाठी होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक यामुळे नको तो विमा असे म्हणत शेतकऱ्यांनी विमा नाकारला आहे. जेवढी रक्कम विम्याची कपात केली जाते, त्याप्रमाणात भरपाई मिळत नसल्यास उपयोग काय असा प्रश्‍नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

पीक--संरक्षित क्षेत्र (हेक्टर) --शेतकरी

कपाशी-- १ लाख १९ हजार ५७३ --१ लाख २३ हजार ४१८

मूग--१ हजार ४२१-- -- १ हजार ६७४

मका--७ हजार ३१० -- ८ हजार १०

सोयाबीन-- ६ हजार २२८ -- ६ हजार ५५१

ज्वारी--७८५ --९००

बाजरी--१४७ --१७१

उडीद--६५८ --७३२

तूर---७६० --८९२

एकूण--१ लाख ३७ हजार ६६ --१ हजार ४२ हजार ५१९

Farmers crop insurance scheme latest marathi news
2 दिवसात साडेतेरा हजार तिरंग्याची विक्री; NMC कर्मचाऱ्यांना खरेदी बंधनकारक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com