Bakri Eid 2023 : बकरी ईदनिमित्त विश्वशांतीसाठी प्रार्थना; समान नागरी कायद्याला विरोध

Muslim brothers gathered for congregational prayers at Idgah ground in the city on the occasion of Bakri Eid.
Muslim brothers gathered for congregational prayers at Idgah ground in the city on the occasion of Bakri Eid. esakal

Bakri Eid 2023 : बकरी ईदनिमित्त गुरुवारी (ता. २९) मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टतर्फे इदगाह मैदानावर हजारोच्या संख्येने लोकांनी नमाज अदा करत विश्वशांतीसाठी प्रार्थना केली.

ईदगाह ट्रस्टच्या घटनेत १९९७ पासून सुधारणा न झाल्याने व वक्फ बोर्डला नवीन योजना २०११ पासून दिली न गेल्याने त्यात विविध मुद्दे समाविष्ट करण्यात आले.

त्याचप्रमाणे जळगाव शहरातील १५ वॉर्डांचे १९ वॉर्ड करण्यात आले, तर स्वीकृत सदस्यांची संख्या ६ वरून २ करण्यात आली. (bakri eid 2023 Thousands of people offered namaz at Eidgah ground and prayed for world peace jalgaon news)

हा बदल घटना समितीच्या अहवालावरून घेण्यात येत असल्याचे अध्यक्ष वहाब मलिक यांनी सूचविले.

जळगाव शहरातील सुमारे ८ ते १० हजार लोकांच्या साक्षीने भारत सरकारने विधी आयोगामार्फत नोटीस काढून समान नागरी कायद्याबाबत विचारणा केली आहे, त्या कायद्यास मुस्लिम समाजाचा संपूर्णपणे विरोध असून, यामुळे भारतातील सर्व धर्मातील सांस्कृतिकपणास बाधा येऊन त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल, म्हणून समान नागरी कायद्याला विरोध दर्शवीत आहोत, अशा आशयाचा ठराव फारूक शेख यांनी मांडला. त्यास सर्वांनी मान्यता दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Muslim brothers gathered for congregational prayers at Idgah ground in the city on the occasion of Bakri Eid.
Bakri Eid : मटन शिजवताना फॉलो करा या 3 टिप्स, बनेल परफेक्ट

पोलिस दलातर्फे शुभेच्छा

ईदगाह मैदानावर पोलिस अधीक्षक एस. राजकुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक संदीप गावित, वरिष्ठ निरीक्षक किसन पाटील व जयपाल हिरे यांच्या उपस्थितीत बंदोबस्त ठेवला होता. पोलिस दलातर्फे आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यात आल्या.

मौलाना सलिक सलमान यांचे प्रवचन

ईदची नमाज सुरू होण्यापूर्वी अकसा मस्जिद चे इमाम सलमान सलीक यांनी उर्दूमध्ये ईदचे महत्त्व विशद केले. फारुक शेख यांनी ट्रस्टचा आढावा सादर केला. आभार संचालक ताहेर शेख यांनी मानले.

Muslim brothers gathered for congregational prayers at Idgah ground in the city on the occasion of Bakri Eid.
Bakri Eid 2023: रिमझिम सरीत सामाजिक सलोख्याचे दर्शन! मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद उत्साहात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com