
जळगाव : निंबादेवी धरण परिसरात फिरायला गेलेल्या आठ जणांचे प्राण मोठ्या कठीण परिस्थितीत वाचविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले होते. ही घटना गेल्या आठवड्यातील होती. तरीही गेल्या रविवारी (ता. २४) याच धरणावर पर्यटकांनी प्रचंड गर्दी दिसली होती. अनेकांनी त्यात पोहण्याचा आनंद घेतला, सेल्फी काढण्याचा मोह टाळला नव्हता. जर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला तर पर्यटनासाठी गेलेल्यांच्या जिवावर पुन्हा बेतले असते. यामुळे जिल्ह्यातील आगामी दोन महिन्यांसाठी जिल्ह्यातील धबधबे असलेल्या सहा पर्यटन स्थळांवर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. (Latest Marathi News)
जिल्ह्यात आगामी काळात अतिवृष्टीचा धोका आहे. अचानक मुसळधार पाऊस सुरू होऊन धरण, नद्यांना पुर येवू शकतो. पावसाळ्यात धरणातील पाणी, धबधबे पाहण्यास पर्यटकांची गर्दी होते. त्यात पाण्याच्या प्रवाहासोबत फोटो काढणे, सेल्फी काढणे जिवावर बेतू शकते. त्यात त्यांच्या जीवितास धोका होवू शकतो. यामुळे जिल्ह्यातील सहा पर्यटन स्थळांवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
मागील २८ दिवसांत मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. पुढील महिन्यातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यातील सहा पर्यटनस्थळावर दोन महिन्यांसाठी कलम १४४ जमावबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे. त्यामुळे आता दोन महिने पर्यटनस्थळावर जाण्यावर निर्बंध लागणार आहे.
येथे आहे जमावबंदी
जमावबंदी लागू केलेल्या पर्यटनस्थळांमध्ये सावखेडा सिम निंबादेवी धरण परिसर (ता. यावल), मनुदेवी येथील धबधब्याजवळील सुरक्षा कठड्याजवळील परिसर (ता. यावल), चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी अभयारण्य येथील धवलतिर्थ व केदारकुंड धबधबा परिसर, रावेर तालुक्यातील सुकी धरणाखालील पात्र परिसर, जळगाव तालुक्यातील कांताई बंधारा परिसर.
या गोष्टींवर प्रतिबंध असेल.
* पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना प्रतिबंध.
* वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे, पोहणे.
* धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.
* धोकादायक ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे यावर फोटो काढणे.
* नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश.
* मद्य बाळगणे, अनधिकृत मद्य विक्री करणे.
* वाहतुकीचे रस्ते, धोकादायक ठिकाणी वाहणे थांबविणे.
* वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे.
* सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांनी छेडछाड करणे.
* मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे.
* धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी, वाहनांना प्रवेश बंद.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.