व्यावसायिक बदलांमुळे ‘बलुतेदारी’ला अवकळा; सुतार कारागिरांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न

पूर्वी शेतीसाठी लागणाऱ्या कृषी साहित्यांसाठी शेतकऱ्यांना सुतारांकडे धाव घ्यावी लागत होती.
Carpenters
Carpenterssakal

वावडे (ता. अमळनेर) : पूर्वी शेतीसाठी लागणाऱ्या कृषी साहित्यांसाठी शेतकऱ्यांना सुतारांकडे धाव घ्यावी लागत होती. मात्र, आता लाकडी अवजारांऐवजी तयार मिळणारी लोखंडी अवजारे उपलब्ध झाल्याने पूर्वीच्या बलुतेदार पद्धतीवर अवकळा आल्याने कारागिरांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, सुतार व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. (Latest Marathi News)

बारा बलुतेदारांमध्ये सुतार समाज हा महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रत्येक गावागावांत सुतार समाजाचे आस्तित्त्व आहे. सुतार समाज म्हटले, की लाकडाचे काम करणारे कारागीर आपल्या नजरेसमोर येतात. घर बांधकाम असो की अन्य फर्निचर कामे असो, यात काळानुसार मोठे बदल झाले आहेत. प्राचीन व मध्ययुगीन काळात ग्रामीण भागातील बलुतेदारी पद्धती अस्तित्वात होती. ही पद्धती काळाच्या ओघात लुप्त पावत चालली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक खेडेगावात बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार होते.

Carpenters
मेहूणीच्या साखरपुड्यानंतर 'तो' ढसाढसा रडला, कारण ऐकून बायकोला बसला धक्का

बलुतेदार व अलुतेदार गावातील शेतकऱ्यांना वर्षभर सेवा पुरवत असून, त्या मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून मोबदला म्हणून धान्य मिळे. परंतु, यांत्रिक युगाचा प्रारंभ झाल्यापासून शेतीमध्ये लागणाऱ्या लाकडी अवजाराऐवजी कारखान्यातूनच रेडिमेड मिळणारी लोखंडी अवजारे उपलब्ध होत असल्याने बारा बलुतेदारांमध्ये समाविष्ट असलेल्या सुतारांच्या व्यवसायावर पाणी फेरले आहे. सुतार कुटुंबीयांचे संपूर्ण जीवन हे त्यांच्या कलाकौशल्यातून घडविलेल्या विविध लाकडी वस्तूंच्या मिळकतीतून घडविले जात असे. शेतीसाठी लागणारे, नांगर, वखर, फन, डवरा, ज्यू, भोवऱ्या खाचरा बंडी, तिफन, खातवा, रुमण आदी अवजारे तर घरगुती साहित्यात पलंग, टेबल, खुर्ची, पाट, घराचे छप्पर ठोकणे, दरवाजे, खिडक्या, कोरपाट-बेलन आदी वस्तू तयार करीत असे.

Carpenters
कौतुकास्पद! राज्यातल्या काँग्रेस नेत्याच्या ८ वर्षांच्या मुलीने केस दान केले...

घरगुती साहित्य असो की, शेतीची अवजारे पावसाळा सुरू होण्यापूर्वी नवीन साहित्य बनविण्यासाठी किंवा त्यांची दुरुस्ती करण्यासाठी शेतकरीवर्ग सुताराकडे येरझारा मारत असत. सुतारही त्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन पाहिजे त्या आकारात शेतीची अवजारे बनवून देत असत. सुतार बनवलेल्या अवजारांपासून मिळालेल्या मिळकतीतून आपल्या कुटुंबीयांची गरज भागवीत असे. परंतु आता लोखंड व प्लास्टिकपासून बनविलेली शेतीची अवजारे बाजारात उपलब्ध झाली आहेत. किमतीच्या बाबतीत ही अवजारे थोडी महाग असली तरी टिकावू होत असल्याने रेडिमेड अवजारांकडे आकर्षित होत आहे. यामध्ये बैलगाडी, भोवरी, वखर, डवरा शहरात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे एकेकाळी १२ बलुतेदारांत महत्वाचा मानला गेलेला सुतार व्यवसाय करणाऱ्या सुतारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Carpenters
'मराठी माणसाचा अपमान राज्यपालच करत असतील तर...' समीर विद्वांसचा घणाघात..


''ग्रामीण भागात वडिलोपार्जित व्यवसाय करीत असून, माझ्यावर कालौघात उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या अंगातील कला जिवंत ठेवण्यासाठी शासनाने प्रभावीपणे उपाययोजना राबविली पाहिजे, व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी आवश्यक प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करू न देण्याची गरज आहे. नामशेष होणाऱ्या या कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून देत व्यवसायाला उभारी दिली पाहिजे.'' - श्‍याम साहेबराव सुतार, सुतार व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com