Jalgaon News : ‘बांडी’ची यंदा उडाली दांडी, 100 रुपयांत तिनशेच कांडी

खानदेशात उसाचे पीक काही नवे नाही. ऊस तोडणी मजूर दिवसभर ऊस तोडून येणारी बांडी सायंकाळी जवळच्या गावात विकतात.
A sugarcane cutting laborer selling pandi in the evening after the day's sugarcane cutting.
A sugarcane cutting laborer selling pandi in the evening after the day's sugarcane cutting.esakal

Jalgaon News : खानदेशात उसाचे पीक काही नवे नाही. ऊस तोडणी मजूर दिवसभर ऊस तोडून येणारी बांडी सायंकाळी जवळच्या गावात विकतात.

मात्र ही बांडी आता शंभर रुपयांत कमी होत होत तीनशे कांड्यावर आली असून, यावर्षी ऊस लागवड कमी झाल्याने ही महागाई झाल्याचे दिसून आले आहे. (Bandi now reduced to one hundred rupees and came to three hundred jalgaon news)

खानदेशात गेली ३० ते ३५ वर्षे ऊसाचे पीक घेतले जाते. तेव्हापासून बांडी विक्री होते. पूर्वी ही बांडी बरीच स्वस्त मिळत, असे मात्र महागाई, टंचाई, वाढती मागणी आदी गोष्टीमुळे आता ही बांडी महागली आहे.

गेल्या काही वर्षांत ही बांडी दहा वाढ्यांची, पाच वाढ्यांची, तीन वाढ्यांची झाली. त्यानंतर दररोजची बंधी असलेल्या गुरे मालकांनी एव्हड्या वाढ्यांची बांडी सोडून ती गुरांना टाकण्याचे श्रम कमी करण्यासाठी तेवढ्या कांड्यांचा भेला बांधण्याचा मार्ग पुढे आला.

A sugarcane cutting laborer selling pandi in the evening after the day's sugarcane cutting.
Jalgaon News : जळगावलगत खेडी शिवारात साकारणार वारकरी भवन; 150 भक्तांची निवासव्यवस्था

पूर्वी तर शेतमालकलाही पाच कांड्याचे पंचवीस, नंतर दहा, तर कधी पाच पुडे मिळत होते. आता तेही काही भागात मिळत नाही. काहीही असले तरी घटणाऱ्या ऊस लागवडीचा परिणाम बांडीच्या भावावर दिसून आला आहे.

A sugarcane cutting laborer selling pandi in the evening after the day's sugarcane cutting.
Jalgaon News: धरणगावातील स्मृती स्थळांसाठी 9 कोटी मंजूर; पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून निधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com