Jalgaon News : ‘शासन आपल्या दारी’ त लाभार्थ्यांना त्रास नको : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil News
Gulabrao Patil Newsesakal
Updated on

Jalgaon News : राज्य शासनाने शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. प्रशासनाच्या विविध विभागांनी याची योग्य ती प्रचार आणि प्रसिद्धी करावी.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर, येणाऱ्या लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी (ता. २२) दिल्या.(Beneficiaries should not suffer at Shasan aplya dari Gulabrao Patil Preliminary review on occasion of Chief Minister visit Jalgaon News)

‘शासन आपल्या दारी’ अभियानातंर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या २७ जूनला जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर येथील नियोजन भवनात झालेल्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती

बैठकीस खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, सुरेश भोळे, किशोर पाटील, लता सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, उप वनसंरक्षक विवेक होशींग, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, अपर पोलस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्‍याम लोही, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, नपाचे जनार्दन पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे आदी उपस्थित होते.

Gulabrao Patil News
Jalgaon News : जिल्हाधिकाऱ्यांकडून जलतरण तलावाची पाहणी

२७ नोडल अधिकारी नियुक्त

या दौऱ्याच्या यशस्वितेसाठी जिल्हा प्रशासनातील २७ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून, त्यांच्या जोडीला सुमारे ६० उपनोडल अधिकारी काम करणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

प्रारंभी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाबाबत सादरीकरण केले. खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, सुरेश भोळे यांनी विविध विषयांबाबत सूचना केल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gulabrao Patil News
Jalgaon Crime News : रिक्षात प्रवाशी बसवुन चाकु लावून करत होते लूट; दोन संशयितांना अटक

दिव्यांगांची स्वतंत्र व्यवस्था करा

पालकमंत्री पाटील म्हणाले, की त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबदारीनुसार नियोजन करावे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी पार्किंग, भोजन व पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था ठेवावी. उपस्थित राहणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांची स्वतंत्र्य व्यवस्था करावी. आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवावी. जास्तीत जास्त लाभार्थी उपस्थित राहण्यासाठी व्यापक प्रचार व प्रसिद्धी करावी.

आरोग्य व्यवस्था करावी

पोलिस यंत्रणेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे प्रोटोकॉलप्रमाणे सुरक्षा व्यवस्था ठेवावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तदान शिबिर घ्यावे. ३५ हजारांपेक्षा जास्त उपस्थिती राहणार असल्याने कार्यक्रमस्थळी डॉक्टरांची टीम, रुग्णवाहिका व शौचालयाची व्यवस्था करावी, अशी सूचना त्यांनी केली.

पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या प्रचाररथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. परिसरात उभारलेल्या सेल्फी पॉईंटवरून पालकमंत्र्यांसह मान्यवरांनी फोटो काढले. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी सूत्रसंचालन केले.

Gulabrao Patil News
Jalgaon Municipal Corporation : शंभर कोटींतील कामाना ना-हरकत देऊ नये; महापौरांचे आयुक्तांना पत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com