BHR Case : कोटी रुपयांस गुन्हेगार खोका म्हणतात, तर उच्चशिक्षित फाइल; पुराव्यांची सरबत्ती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BHR Patsanstha Fraud Case

BHR Case : कोटी रुपयांस गुन्हेगार खोका म्हणतात, तर उच्चशिक्षित फाइल; पुराव्यांची सरबत्ती!

जळगाव : गुन्हेगारी (Crime) क्षेत्रात एक कोटी रुपयांना खोका म्हटले जाते, तर उच्चशिक्षित असलेल्या ॲड. प्रवीण चव्हाण यांनी व्यवहाराचे बोलणे करताना फाइल्स,

डॉक्युमेंट अशा कोडवर्डचा वापर केल्याचे सरकार पक्षातर्फे ॲड. सुरेंद्र काबरा यांनी युक्तिवाद केला. (bhr extortion case Abundance of evidence by government in rebutting defenses Photographs recording produced in court jalgaon news)

संशयित ॲड. प्रवीण चव्हाण आणि शेखर सोनाळकर यांच्या जामीन अर्जावर बचाव पक्षाचा युक्तिवाद खोडून काढताना सलग तीन तास सरकार पक्षाने पुराव्यांची सरबत्ती करत म्हणणे सादर केले. उर्वरित युक्तिवाद मंगळवारी (ता. १४) सकाळी अकराला होणार आहे.

डेक्कन पोलिस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात अटकेतील सुनील झंवर यांच्या जामिनासाठी मदत करण्यासाठी मुलगा सूरज झंवर यांच्याकडून उदय पवार याच्या माध्यमातून सरकारी अभियोक्ता ॲड. प्रवीण चव्हाण, लेखापरीक्षक शेखर सोनाळकर यांनी एक कोटी २२ लाख रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्ह्यात जामीन मिळविण्यासाठी न्या. जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात कामकाज सुरू आहे. शुक्रवारी(ता. १०) बचाव पक्षाने जामिनावर युक्तिवाद करताना ॲड. गोपाल जळमकर यांनी फिर्यादीत दाखल मुद्द्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून विचारांती गुन्हा दाखल केल्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडला होता. आज सरकापक्षातर्फे संशयितांच्या अटकेची मागणी करताना बचाव पक्षाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना खोडून काढत तब्बल तीन तास सरकार पक्षाने आपली बाजू मांडली.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

‘गिरीश महाजन करू शकले नाही ते करू’

ॲड. प्रवीण चव्हाण यांनी सुरवातीला त्यांचा ज्युनिअर मोहित माहिमतुरा यांच्याहस्ते निरेाप पाठवून चाळीसगावच्या उदय पवारचा नंबर दिला. उदय पवार ने सिग्नल या मोबाईल ॲपवरून ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याशी बोलणे करवून दिले. तेव्हा मंत्री गिरीश महाजन तुझ्यासाठी जे करू शकले नाही, ते मी करू शकतो.

अन्यथा तुझ्या व तुझ्या वडिलांना दुसऱ्या गुन्ह्यात ओढले जाईल. तुमचे गोठवलेले बँक खाते उघडून देण्यासाठी दोन कोटींची खंडणीची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती एक कोटी २२ लाख रुपये उदय पवार याला घरी जाऊन देण्यात आले. पैसे देऊनही चव्हाण यांनी जामिनाला विरोध केला.

दरम्यान, एकच महिन्यात सुनील झंवर यांचा जामीन झाल्यावर सूरजने आपल्या वडिलांना घडला प्रकार सांगितला. तेव्हा सुनील झंवर यांनी उदय पवार याची कजगाव पेट्रोलपंपावर भेट घेत पैशांची मागणी केली. तर सुनील झंवर, मुलगा सूरज झंवर आणि उदय पवार हे तिघे बोलत असतानाचे संभाषण आणि उदय पवार यांच्या वाइन शॉपमधील शूटिंग न्यायालयात सादर करण्यात आले.

ॲड. चव्हाण-सोनाळकरांचा लेखाजोखा

पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात फॉरेन्सिक ऑडिटर नेहा फडके आपल्या सांगण्याप्रमाणे काम करत नसल्याने दमदाटी करून तुमच्यावर गुन्हा दाखल करेल, अशी धमकी दिल्याचे श्रीमती फडके यांनी पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्तांकडे लेखी तक्रार दिली होती.

तसा लेखी जबाबही नोंदविला आहे. गुन्ह्याच्या तपासाधिकारी सुचेता खोकले यांनाही अरेरावीची भाषा करून न्यायालयात वारंवार गैरहजर राहत असल्या

प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नियंत्रणकक्ष यांच्याकडे लेखी तक्रार केली. बीएचआर प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी देखील ॲड. चव्हाण यांच्या वागणुकीबाबत टिपणी लिहून ठेवल्याचे दस्तऐवज न्यायालयात मांडण्यात आले.

फॉरेन्सिक ऑडिटर शेखर सोनाळकर यांनी सीआयडीसह वरिष्ठ अधिकाऱ्याचा संदर्भ देत बीएचआरच्या ५५ गुन्ह्यांच्या लेखापरीक्षणाचे काम मिळविले. त्यासाठी ३० लाख रुपये फीची मागणी केली होती.

युक्तिवादात ‘इसाफ नीती’

ॲड. काबरा यांनी युक्तिवाद करताना फॉरेन्सिक ऑडिटर शेखर सोनाळकर हे घटना घडली तेव्हा नागपूर येथे होते. हा मुद्दा खोडताना बालकथा ‘इसाफ नीती’चा आधार घेत. ‘पर्वत महंमदकडे येऊ शकत नसला तरी महंमद पर्वताकडे जाऊ शकतो’,

असा युक्तिवाद मांडत ॲड. प्रवीण चव्हाण कुठे आहे हे फिर्यादीने म्हटलेलेच नाही, असे अधोरेखित केले. सोबतच सिग्नल या मोबाईल ॲपद्वारे कशा पद्धतीने कॉन्फरन्स कॉल होऊ शकतो, हे न्यायालयास पटवून दिले.