Jalgaon News : पाडळसे बाबत गुजराथी -खडसे-महाजनांचा पक्षपात

Padalse project
Padalse projectesakal

अमळनेर : पाडळसे प्रकल्पाची संकल्पना ५७ वर्षांपूर्वीची असूनही संकल्पनेला मूर्तरूप नाही. जिल्ह्यातील बाहुबली नेते अरुणभाई गुजराथी, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी मनावर घेतले असते तर ३०० कोटीत प्रकल्प पूर्ण होऊन शेतकरी समृद्ध झाला असता. मात्र, या मंडळींनी पाडळसेबाबत पक्षपात केला, दुजाभाव केल्याचा लोकसमज आहे.

पाडळसेच्या आधी खडसे-महाजनांनी बोदवड प्रकल्पाचे पालुपद पुढे करत पाडळसेची पाणी क्षमता आणि उंची दोन्हीही कमी करत खच्चीकरण केले. तर भाईंनी प्रकल्पासाठी आपली मधूर वाणी कधीच खर्ची पाडल्याचे ऐकिवात नाही.

या त्रयींनी ठरवलं असत तर ३०० कोटीत पाडळसे कधीचाच साकारला असता. शेतीला पाणी, हाताला काम मिळून स्थलांतराची वेळच उद्भवली नसती. आत्महत्या झाल्या नसत्या, आरोग्य, शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या असत्या. येथील व्यापार, उद्योग वाढीस लागले असते. (Bias of Gujarati Khadse Mahajan regarding Padalse Jalgaon News)

Padalse project
Jalgaon News : वाहतुकीचे रस्ते अतिक्रमणाने भरले; पदाधिकारी, नगरसेवकांचाही आशीर्वाद?

पाडळसे प्रकल्पाची संकल्पना ही १९६६ पासूनची. याच जागेवर तेव्हा कोल्हापूर टाइप बंधारा बांधण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र हा विषय बारगळला. त्यानंतर साधारण दहा वर्षांच्या अंतराने १५ नोव्हेंबर १९७६ मध्ये प्रकल्पाबाबत अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला.

तर मार्च १९९७ मध्ये प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. यानंतर तब्बल दोन वर्षांच्या अंतराने १४ मार्च १९९९ मध्ये प्रत्यक्ष भूमिपूजन झाले. वास्तविक एकनाथ खडसे हे जलसंपदा तसेच पालकमंत्री होते. विलंब का झाला? याबाबत मात्र आजतागायत कोणीच शंका उपस्थित केली नाही, जाब विचारला नाही.

Padalse project
Nashik News : विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राचे विस्तारीकरण; सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी

भूमिपूजनासाठी सहा लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ६ लाख ४५ हजार रुपये खर्ची पडले. तापी विकास महामंडळाला मंजूर निधीपेक्षा ४५ हजार रुपये जास्तीचा पदरमोड करावा लागला होता, हे वास्तव आहे. त्यावेळी प्रकल्पाची किंमत अवघी १४२ कोटी होती. यानंतर सप्टेंबर २००९ मध्ये ११२७ कोटीच्या प्रकल्प खर्चाला मान्यता देण्यात आली.

आज प्रकल्पाचा खर्च तब्बल पाच पटीने वाढलेला असून, कळस म्हणजे २००९ नंतर एकदाही सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी शासन, संबंधित विभाग किंवा लोकप्रतिनिधींनी तसदीच घेतलेली नाही. दरम्यान, तत्कालीन आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी गुंतवणूक मान्यता समितीकडे २०१३ मध्ये प्रस्ताव दाखल केला होता. त्याला २०१८ मध्ये मान्यता मिळाली. आता खर्चाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसह गुंतवणूक मान्यता समितीच्या मान्यतेचही सोपस्कार पार पाडावे लागणार आहेत.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

Padalse project
Nashik News : उद्यानातील खेळण्या चोरट्यांकडून लंपास; मृत्युंजय महादेव मंदिर उद्यानाची दुरवस्था!

पाणी पळविले कोणी?

मार्च १९९७ च्या आराखड्यात पाडळसे प्रकल्पाची पाणी क्षमता १४.८५ टीएमसी एवढी होती. मात्र २००५-०७ च्या आराखड्यात ती थेट ९.३१ टीएमसी झाली. मग ५.५४ टीएमसी पाणी कमी केले कोणी? खडसे आणि महाजन द्वयीने बोदवड परिसर प्रकल्पाचे पालुपद पुढे केले, त्यांच्या प्रभावक्षेत्रातील अर्थात मतदारसंघातील पाडळसेनंतरच्या प्रकल्पांना गती दिली. काही प्रकल्पांचा केंद्राच्या योजनांमध्ये समावेश करून घेतला असल्याचा ठपका ठेवण्यात येतो.

Padalse project
Nashik News : मालेगावात डीके काॅर्नर भागातील दाम्पत्याची आत्महत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com