esakal | ‘भाजप’ चक्काजाम आंदोलनास उतरले; आणि पोलिसांनी प्रयत्न उधळला 

बोलून बातमी शोधा

‘भाजप’ चक्काजाम आंदोलनास उतरले; आणि पोलिसांनी प्रयत्न उधळला }

आंदोलनासाठी काही भाजपच्या महिला पदाधिकारी उपस्थित झाल्या. त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली.

‘भाजप’ चक्काजाम आंदोलनास उतरले; आणि पोलिसांनी प्रयत्न उधळला 
sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः येथील भाजपच्या महिला आघाडीतर्फे आज पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार होते. जिल्ह्यात वाढत्या कोरोनामुळे सर्वच आंदेालनाला जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. यामुळे महिलांचे चक्काजाम आंदोलन होण्यापूर्वीच महिला पोलिसांनी आंदोलक महिलांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यात आंदोलक केवळ अकरा महिला होत्या. त्यांनी पोलिसांनी आंदोलन करू दिले नाही, आमच्याशी झटापट करीत ताब्यात घेतले असा रोष व्यक्त करण्यात आला. 

आवश्य वाचा- ‘खाकी’च्या सतर्कतेमुळे वाचला दिव्यांग दांपत्याचा जीव !
 

बीडच्या पूजा चव्हाण हिने पुण्यात आत्महत्या केली आहे. या कथित प्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री संजय चव्हाण यांचे नाव विरोधकांकडून घेतले जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर सुरुवातीच्या काळात मंत्री संजय राठोड हे काही दिवस नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते सर्वांसमोर आले. परंतु, त्यांनी या प्रकरणात त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत मौन बाळगले. राज्य शासनाने देखील या प्रकरणाच्या चौकशीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे पावले उचलली नाही, मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. मंत्री राठोड यांचा राजीनामा घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, पूजाला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी भाजपच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. 

आवर्जून वाचा- ज्येष्ठांचे लसीकरण लसीकरणाची उत्सुकता; पण केंद्राकडून मार्गदर्शन नाही  ​
 

आकाशवाणी चौकात होणार होते आंदोलन? 
जळगाव भाजप जिल्हा व महानगरातर्फे आज सकाळी आकाशवाणी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार होते. आंदोलनासाठी काही भाजपच्या महिला पदाधिकारी उपस्थित झाल्या. त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वीच पोलिसांनी सर्व महिला आंदोलकांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. 


यावेळी भाजपच्या महिला पदाधिकारी व महिला पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली. पोलीस आंदोलक महिलांना ताब्यात घेत असताना राज्य शासन, मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलिस ठाण्यात नगरसेवक कैलास सोनवणे, भाजपचे दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.