Jalgaon : मारहाणीत तरुणाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beating

Jalgaon : मारहाणीत तरुणाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर

जळगाव : नशिराबाद येथे काहीही कारण नसताना तरुणाला लोखंडी रॉडने हल्ला करून मारहाण केल्याने नाक फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली. नशिराबाद पोलीसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नशिराबाद पोलीसांत दाखल तक्रारीनुसार, सैय्यद अर्शद अली शेख (वय १८) हा कुटुंबीयांसह ताजनगर डीपीजवळ वास्तव्याला आहे. शनिवारी (ता. २१) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास शहरातील परकोट मोहल्ला येथे सैय्यद अर्शद अली शेख हा उभा असताना विनाकारण त्याच्या गल्लीतील नाजीम रहीम शेख (वय २१), रहिम शेख फरीद (वय ३५), शेर अली सैय्यद अली (वय २८) आणि अरबाज अली सैय्यद अली (वय २४, सर्व रा. परकोट मोहल्ला) अशांनी त्याला बेदम मारहाण केली. यातील एकाने सैय्यद अर्शद अली शेख याच्या नाकावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याने त्याचे नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. नाकातून प्रचंड रक्तस्त्राव होत असताना त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीचा जबाब नोंदवून मध्यरात्री नाजीम रहीम शेख, रहिम शेख फरीद, शेर अली सैय्यद अली आणि अरबाज अली सैय्यद अली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक युनूस शेख करीत आहे.

हेही वाचा: जनावरे चोरणारे दोघे अट्टल जाळ्यात; 20पेक्षा जास्त गुन्हे दाखल

हेही वाचा: RPFला मारहाण करणाऱ्या संशयिताची पोलिसांनी काढली धिंड

Web Title: Bone Fracture Of A Young Man In A Fighting Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaon
go to top