BRS Jalgaon News : जिल्ह्यात भारत राष्ट्र समिती सक्रिय; सदस्य नोंदणी सुरू

BRS party
BRS partySakal

BRS Jalgaon News : राज्याप्रमाणेच जळगाव जिल्ह्यातही भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष सक्रिय झाला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकरा विधानसभा व एका जिल्हा समन्वयकाची नेमणूक करण्यात आली आहे.

मोठमोठे होर्डिंग, घरोघरी प्रचार व सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले आहे. (BRS Jalgaon Bharat Rashtra Samithi active in district jalgaon news)

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्ष सक्रिय होत असतानाच भारत राष्ट्र समिती या नव्या पक्षाने गावागावांत प्रचार सुरू केला आहे. तूर्तास सक्रिय कार्यकर्ते कमी असले तरी टॅबच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान राबवित आहे. शिवाय शेतकरी व सामान्य व्यावसायिकांच्या हिताच्या पक्षाच्या योजना पुस्तिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहचवत आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्र प्रवेश केला आहे. मराठवाड्यापासून सुरवात झाल्यावर आता उत्तर महाराष्ट्रातही पाऊल टाकली आहेत. नाशिकसारख्या मोठ्या शहरात ठिकठिकाणी उभारल्या गेलेल्या होर्डिंग्जप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये केसीआर यांच्या फोटोसह 'अबकी बार....किसान सरकार’ ही टॅगलाइन असलेले प्रचाराचे होर्डिंग्ज झळकत आहेत.

एकट्या भुसावळ शहरात सुमारे सात होर्डिंग्ज लागले आहेत. हा प्रचार होर्डिंग्ज पुरता मर्यादित नाही. तर देशातील शेतीची सद्य स्थिती, कारणे व तेलंगणात राबविण्यात आलेल्या विविध योजना अशी माहिती पुस्तिका व प्रदिप साळुंखे लिखित 'तेलंगणा माझा अनुभव ' हे पुस्तक घरोघरी वाटले जात आहे. प्रचारासाठी पोलिस ठाण्यात अर्ज देऊन रितसर परवानगी काढली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

BRS party
BRS : ८ दिवसांतून एकदा पाणी, शेतकऱ्यांना वीज नाही, मग विकास कसला? ; केसीआर यांचा शिंदे सरकारला सवाल

काही कार्यकर्ते टॅबवर सदस्य नोंदणी करीत आहेत. ही सर्व जबाबदारी पक्षाचे जिल्हा समन्वयक देवेंद्र वराडे यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली जात आहे. वराडे हे या आधी शेतकरी संघर्ष संघटनेत कार्यरत होते. संघटनेत शहराध्यक्ष ते उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शेतकरी संघर्ष संघटना सोडून भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे.

पक्षाच्या जिल्ह्यातील कामाबद्दल ‘सकाळ’शी बोलताना वराडे म्हणाले, की पक्षात किसान सेल महत्त्वाचा आहे. इतर घटकांचेही तितकेच महत्त्व आहे. जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रानुसार समन्वयक व सहसमन्वयक नेमण्यात आले आहे. आता ब्लॉक कमिट्या तयार होतील. नंतर कार्यकारिणी घोषित होईल.

आतापर्यंत भुसावळ तालुक्यात हजारापर्यंत सदस्य नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात आठ ते दहा हजार सदस्य नोंदणी झाली असावी. आगामी काळात ही नोंदणी अधिक वेगवान होईल. कारण तेलंगणातील चारशे योजनांमुळे तेथील लोकांच्या जीवनात झालेले परिवर्तन आम्ही लोकांना समजवून सांगत आहोत, असे वराडे म्हणाले.

BRS party
BRS: पंकजा मुंडेंनंतर बीआरएसच्या टार्गेटवर महाराष्ट्रातला आणखी एक बडा नेता, दिली मुख्यमंत्रिपदाची ऑफर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com