Nashik Crime News : नाशिकमध्ये वृद्धाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime-Scene

Nashik Crime News : नाशिकमध्ये वृद्धाचा खून

सिडको : अंबड लिंक रोड वरील कर्डेल मळा येथे ६५ वर्षीय वृद्धाचा डोक्यात हत्याराने वार खून केल्याची घटना आज रात्री पावणेदहापूर्वी सुमारास घडली. बच्चू सदाशिव कर्डेल असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

घटनास्थळ व पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, कर्डेल यांच्या घरामध्ये लग्न असल्याकारणाने त्यांचे सर्व कुटुंबीय आज (ता.२६) हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. बच्चू कर्डेल यांची प्रकृती ठिक नसल्याने कार्यक्रमास न जाता घरी एकटे होते. रात्री साडेआठच्या सुमारास आप्तस्वकीयांनी घरी येऊन त्यांची विचारपूस केली.

हळदीसमारंभाच्या कार्यक्रमातून पावणेदहाच्या सुमारास कर्डेल यांचे दोन आप्तस्वकीय घरी आले. त्यातील एक इन्होवा हे वाहन घेऊन निघून गेला. दुसरा आप्तस्वकीय घरा गेला असता त्यांना बच्चू कर्डेल रक्त्याच्या थारोळ्यात पडले असल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित ही माहिती आप्तस्वकीयांना दिली. (Nashik Crime News old man Killed in city)

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Nashik Educational Update : M.E.,M.Techला सव्वा 3 हजार प्रवेश

सर्व आप्तस्वकीय घरी आले. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात शस्त्राने वार करत त्यांना जीवे ठार मारले दिसून आले. तसेच हल्लेखोरांनी त्यांच्या घरात असलेल्या सुमारे सहा ते सात लाख रुपये असलेली कोठी लंपास झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती समजताच परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख, गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ, मध्यवर्ती गुन्हे शाखा वरिष्ठ निरीक्षक आंचल मुदगल, सहाय्यक निरीक्षक किशोर कोल्हे, उपनिरीक्षक संदीप पवार यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून रात्री उशिरा पंचनामा करण्यात येत होता. रात्री उशिरा फॉरेन्सिक टिम घटनास्थळी दाखल झाली होती.

हेही वाचा: Isro Satellite Launch: चर्चा तर होणारच! एकाचवेळी इस्रोने आकाशात सोडले 9 सॅटेलाईट

टॅग्स :Nashikcrime