Jalgaon News : बिबट्याच्या हल्ल्यात वासरू मृत्युमुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard Attack

Jalgaon News : बिबट्याच्या हल्ल्यात वासरू मृत्युमुखी

मेहुणबारे (जि. जळगाव) : गिरणा पट्ट्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. मेहुणबारे शिवारात दोन दिवसांपूर्वी वासरू फस्त केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा लांबे वडगाव (ता. चाळीसगाव) शिवारात बिबट्याने वासरू फस्त केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. (Calf died in leopard attack Jalgaon News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हेही वाचा: Nashik Bribe Crime : निफाडच्या लाचखोर महिला नायब तहसीलदारासह एकाला रंगेहाथ अटक!

लांबे वडगाव (ता.चाळीसगाव) शिवारात बुधवारी (ता. २०) सकाळी शेतकरी विजयसिंग बापू पाटील हे शेतात गेले असता बिबट्याने शेतातील वासरावर हल्ला करून ठार केले. घटनास्थळी वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, वनपाल संजय चव्हाण यांनी पाहणी केली. घटनेचा पंचनामा केला. या वेळी वन विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले, की शेतकऱ्यांनी शेतात गुरे बांधू नये.

गिरणा पट्ट्यात बिबट्याकडून पशुधनावर हल्ले सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी भऊर शिवारात उसतोड सुरू असताना बिबट्याचे बछडे आढळून आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने धाव घेत त्या ठिकाणी बछड्याच्या शोधासाठी मादी बिबट्या येईल म्हणून ट्रॅप कॅमेरे लावले होते.

मात्र, बिबट्या आलाच नाही. त्यानंतर दोन दिवसांनी त्या बछड्याचा मृत्यू झाला होता. मेहुणबारे वा लांबे वडगाव शिवारात वासरांचा फडशा पाडणारी भऊर शिवारात बछडे सोडून गेलेली ती मादी बिबट असावी, अशी शंका परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: Sammed Shikharji Pilgrimage case : अमळनेरला जैन समाजातर्फे कडकडीत बंद!

टॅग्स :JalgaonLeopard