Jalgaon Crime News : कारवाईनंतर रामानंद घटात सट्ट्याचा थाट; 2 दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा ओपन-क्लोज

case has been registered in Ramanandnagar of betting
case has been registered in Ramanandnagar of betting esakal

Jalgaon Crime News : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाणे हद्दीतील गिरणापंपींग रोडवर रामानंद घाट उतरताच हिरव्या नेटची जाळी लावून सट्ट्याचे आकडे घेत असल्याचे समोर आले आहे.

गुन्हेशाखेच्या पथकाने तत्काळ यावर पुन्हा कारवाई करून रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(case has been registered in Ramanandnagar of betting jalgaon crime news)

शहरातील रामानंदनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटाच्या अगदी लागून रहिवासी कॉलनीजवळ सर्रास सट्टा खेळविला जात असल्याच्या तक्रारी काही दिवसांपूर्वी प्राप्त झाल्या होत्या.

त्यावेळी पोलिसांनी कारवाई करून गुन्हे दाखल केले. अटकेतील संशयित सुटल्यावर दोनच दिवस बंद ठेवून तिसऱ्या दिवशी पुन्हा सट्ट्याचाअड्डा सुरु झाला.

case has been registered in Ramanandnagar of betting
Jalgaon Crime News : बसमध्ये चढतांना पर्समधून ऐवज लंपास

एका सामाजिक कार्यकर्त्याने या सट्टा अड्ड्याच्या ठिकाणी मोबाईलद्वारे स्टिंग ऑपरेशन राबवून सट्टा घेतला जात असल्याचा लाइव्ह चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ पोलिस अधीक्षक यांना पाठविला.

तत्काळ वरिष्ठ पोलिस अधिकारी किशन नजन पाटील यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक वाघमारे यांनी कारवाई केली.

case has been registered in Ramanandnagar of betting
Jalgaon Crime News : गावगाड्यात व्यस्त कुटुंबाचे घर फोडले; निवडणुकीचा प्रचार अन्‌ घरात चोरटे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com