Jalgaon : भाजीपाला घेताना मंगळसूत्र लंपास

पिंप्राळा आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करत असताना ही घटना घडली आहे.
chain snatcher
chain snatcheresakal

जळगाव : पिंप्राळा आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करत असताना एका महिलेचे ५५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी गळ्यातून तोडून नेल्याची घटना घडली. जळगाव शहरातील मानराज पार्क परिसरातील विद्यानगरातील हेमलता उमेश पाटील (वय २०) या वास्तव्यास आहेत. त्या बुधवारी (ता. २२) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पिंप्राळा आठवडे बाजारात आल्या होत्या.

यादरम्यान हेमलता पाटील यांच्या गळ्यातील १५ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरले. प्रकार लक्षात आल्यानंतर हेमलता यांनी बाजारात शोध घेतला मात्र मंगळसूत्र मिळून आले नाही. चोरीची खात्री झाल्यावर हेमलता पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहेत.

chain snatcher
क्षुल्लक कारणावरून पत्नीचा खून
chain snatcher
महिलेस मावशी म्हटल्याने प्रैाढास बेदम मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com