चंद्रकांत बढे पतसंस्थेता घोटाळा प्रकरण : CID पथक चौकशीसाठी वरणगावात

चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी फरारी संशयित आरोपींच्या शोधार्थ ‘सीआयडी’चे पथक वरणगाव येथे चौकशीसाठी आले होते.
CID
CIDesakal

वरणगाव (जि. जळगाव) : येथील चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेच्या बुलडाणा शाखेच्या घोटाळ्याप्रकरणी फरारी संशयित आरोपींच्या शोधार्थ उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सीआयडी’चे पथक वरणगाव येथे येऊन चौकशी करून रिकाम्या हाती माघारी फिरले.

सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेच्या बुलडाणा शाखेतील २०१३ मधील घोटाळाप्रकरणी बुधवारी (ता. १५) सात संचलकांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने अटक करून त्यांना बुलडाणा येथे घेऊन गेले होते. त्यावेळी काही संचालक फरार होण्यात यशस्वी झाले होते. परिणामी फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी शनिवारी (ता. १८) सायंकाळी सातच्या सुमारास ‘सीआयडी’चे अनिल पवार यांनी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकात हरी बढे यांना चौकशीसाठी वरणगाव येथे आणले होते. मात्र त्यांना रिकामे हाताने जावे लागले. असे असले तरी महामार्गावरील ढाब्यावर संशयित व पथकातील सदस्यांनी जेवण घेतले व ते पुन्हा बुलडाण्याकडे रवाना झाले.

CID
किसान सन्मान योजनेतील गमतीजमतीमुळे शेतकरी त्रस्त
CID
पंचनामे करताना पैशांची मागणी केल्यास तक्रार करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com