Pune Express : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी अमरावती-पुणे आणि अमरावती-अजनी एक्स्प्रेसच्या संरचनेत बदल केला आहे.
या गाडीला आता वाढीव १ स्लीपर आणि १ एसी थ्री टायर इकॉनॉमी कोच जोडण्यात येणार आहे. (Changes in structure of Pune Express train jalgaon news)
सुधारित रचना अशी : जनरेटर- १, स्लीपर- २, एसी चेअर कार- १, नॉनएसी चेअर कार-१०, एसी थ्री टायर इकॉनॉमी- १ आणि गार्ड ब्रेक यान-२ एकूण १६ एलएचबी कोच असणार आहेत.
पुणे-अमरावती (गाडी क्रमांक ११०२६) एक्स्प्रेसला शनिवार (ता. १६)पासून, तर अमरावती-पुणे (गाडी क्रमांक ११०२५) एक्स्प्रेसला शुक्रवार (ता. १५)पासून, अमरावती-अजनी (१२११९) एक्स्प्रेसला शनिवार (ता. १६), अजनी-अमरावती (१२१२०) एक्स्प्रेसला शनिवार (ता. १६)पासून संरचनेत बदल करण्यात येणार आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.