जळगाव : ग. स.च्या आवारात दे दणादण, संचालकांची पळापळ

ग. स. सोसायटीच्या अध्यक्ष निवडीत चुरस निर्माण झाल्याने प्रचंड उत्सुकता होती.
Jalgaon news
Jalgaon newsesakal
Updated on

जळगाव : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी (ग. स.) सोसायटीच्या अध्यक्ष निवडीत चुरस निर्माण झाल्याने प्रचंड उत्सुकता होती. संस्थेच्या बळीराम पेठेतील कार्यालयात सभेसाठी सहकार गटाचे संचालक फुटीर गटाच्या दोन संचालकांसह वाहनात येताच एकच गोंधळ उडाला. लोकसहकार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी फुटीर संचालकांच्या वाहनाला घेराव घालून त्यांना गाडीतून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. त्यांना मारहाण करण्यात आली. यामुळे तणाव निर्माण झाला होता.

संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी एकला अध्यक्ष निवडीसाठी सभा होती. जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई अध्यक्षस्थानी होते. लोकसहकार गटाचे दोन सदस्य फुटून सहकार गटाला मिळाल्याची चर्चा होती. त्यामुळे लोकसहकार व प्रगती गटाची युती होऊनही त्यांना सत्तेत यश मिळणार नव्हते. त्यामुळे लोकसहकार गटाचे कार्यकर्ते संतप्त होते.

चक्क दे दणादण

दुपारी पाऊणच्या सुमारास सहकार गटच्या संचालकांची वाहने थांबताच लोकसहकारमधून फुटलेल्या दोन संचालकाच्या वाहनांना घेराव घालण्यात आला. त्यावेळी हाणामारी व आरडाओरड सुरू झाली. त्यामुळे एकच गोंधळ सुरू झाला. काय सुरू आहे, हे कोणालाच कळत नव्हते. त्यावेळी पोलिस कमी होते. त्यांनी हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोंधळ अधिकच होत असल्याने तातडीने अधिक पोलिस कुमक मागविण्यात आली. कुमक आल्यानंतर पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना दणका दिला.

Jalgaon news
आईच्या शेतावरून पेटली भावंडात ‘भाऊबंदकी’; नातवाने गमावले प्राण

संचालक पळतच सभागृहात गेले

गोंधळामुळे वाहनातून उतरून पोलिस बंदोबस्तात सहकार गटाचे संचालक अक्षरश: पळतच सभागृहात गेले. प्रत्येक संचालकांना पोलिस बंदोबस्तात सभागृहात पोचविण्यात आले. महिला संचालकही अक्षरश: धावतच सभागृहात गेल्या. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

सभागृहाबाहेर प्रचंड बंदोबस्त

अध्यक्ष निवड सुरू असताना, सभागृहाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त होता. प्रत्येकाला ओखळपत्र पाहूनच कार्यालयात सोडण्यात येत होते. संचालक व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सभागृहात कोणालाच प्रवेश देण्यात आला नाही. निवडीनंतरही पोलिस बंदोबस्त होता.

सभागृहातही लोकसहकारतर्फे धमकी

अध्यक्ष निवडीची सभा सुरू झाल्यानंतर सभागृहातही लोकसहकार गटाच्या संचालकांनी फुटीर संचालकांना धमकी दिल्याचे फुटीर संचालक ज्ञानेश्‍वर सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणालेल की सुनील सूर्यवंशी यांनी आपल्याला धमकी देत युतीकडे मतदान करण्यास सांगितले. मात्र, आपण त्याला घाबरालो नाही.

निवडीनंतर संचालकांना बंदोबस्त

निवडीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक कार्यालयापासून पायीच पोलिस बंदोबस्तात शहर पोलिस ठाण्यात गेले. त्या ठिकाणी अध्यक्ष उदय पाटील यांनी फिर्याद दिली.

आम्हाला ठार मारण्याचा प्रयत्न : उदय पाटील

निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना सहकार गटाचे नेते व सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष उदय पाटील म्हणाले, की आमच्या संचालकांवर हल्ला करण्यात आला. अक्षरश: ठार मारण्याचा प्रयत्न झाला. गेल्या २५ वर्षांपासून आपण निवडणूक लढवित आहोत. विजय किंवा पराजय झाला. मात्र, असा प्रकार कधीही आपण पाहिला नाही. आम्ही सर्व सरकारी नोकर आहोत. कुणी शिक्षण विस्ताराधिकारी आहे, तर अनेक उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यांच्या सोसायटीत असा हाणामारीचा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे आपण व्यथित झालो आहोत. लोकसहकार गटाचे मनोज पाटील, दिलीप चांगरे यांनी हा प्रकार केला आहे. आपण त्यांच्याविरुद्ध पोलिसांत फिर्याद देणार आहोत. असा प्रकार होत असेल, तर यापुढे निवडणूक लढवायची की नाही, याचा आपण विचार करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. या वेळी ते भावूक झाले व त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या प्रकाराचा निषेध म्हणून आपण कोणताही जल्लोष करणार नाहीत, अशी घोषणाही त्यांनी केली.

Jalgaon news
5 बहिणींच्या एकुलत्या एक भावावर काळाचा घाला; कुटुंबाला आक्रोश अनावर

आम्ही फुटीर नव्हे पाठिंबा : सोनवणे

लोकसहकारमधून आम्ही फुटलो नाही, तर आम्ही सहकार गटाला पाठिंबा दिला, असे मत लोकसहकारचे संचालक रवींद्र सोनवणे व ज्ञानेश्‍वर सोनवणे यांनी व्यक्त केले. रवींद्र सोनवणे म्हणाले, की लोकसहकार गटाने सहकार गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. आपण स्वत: त्याबाबत मत मांडले होते. सहकार गटासोबत जाण्याचा निर्णय लोकसहकारच्या सहापैकी पाच संचालकांचा होता. एकाचा प्रगतीसोबत जाण्याचा निर्णय होता. मात्र, जास्त सदस्यांच्या संख्येनुसार आम्ही सहकार गटासोबत आलो. त्यामुळे आम्ही फुटलो, असे म्हणता येणार नाही.

''सभासद फुटल्यामुळे कार्यकर्ते संतप्त होते. आपण त्यांना शांत करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मदत करीत होतो.'' - मनोज पाटील, गटनेते, लोकसहकार गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com