Shiv Jayanti 2023 : चाळीसगावला आज ‘उमंग’च्या ढोलताशाचे सादरीकरण

Sampada Patil and coach Anirudh Dhusar with the drum team of Umang Samajshilpi Mahila Mandal.
Sampada Patil and coach Anirudh Dhusar with the drum team of Umang Samajshilpi Mahila Mandal.esakal

चाळीसगाव (जि. जळगाव) : येथील उमंग महिला परिवारातर्फे खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रेरणेतून शिवजयंतीच्या दिवशी रविवारी (ता. १९) शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महिलांच्या ढोल (Dhol) वादनातून छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष केला जाणार आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj birth anniversary will be celebrated by drumming of women jalgaon news)

यावेळी ढोल ताशा वादनाचे सादरीकरण केले जाणार असल्याची माहिती उमंग महिला परिवाराच्या संस्थापिका संपदा पाटील यांनी दिली.

या संदर्भात माहिती देताना संपदा पाटील यांनी सांगितले, की सुमारे महिन्यापासून शेकडो युवती व महिला भगिनींना या संदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे. उद्या (ता. १९) सायंकाळी हा तुफानी जल्लोष चाळीसगावकरांना अनुभवता येईल.

या ढोल ताशा पथकात युवती, विद्यार्थिनी, विवाहिता, विधवा अशा सर्वच भगिनींचा सहभाग आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होऊन त्यांना आत्मनिर्भर होण्यास मदत मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

Sampada Patil and coach Anirudh Dhusar with the drum team of Umang Samajshilpi Mahila Mandal.
Jalgaon News : चोसाकाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची शुक्रवारी निवड

कुठलाही गाजावाजा न करता शेकडो महिला भगिनी, युवतींना ढोल ताशा वादनाचे प्रशिक्षण राज्यातील आघाडीचे ढोलताशा प्रशिक्षक अनिरूद्ध धूसर यांनी दिले. त्यासाठी शहरातील शहीद हेमंत जोशी क्रीडांगणावरील इनडोअर स्टेडियममध्ये व्यवस्था करण्यात आली होती.

महाआरतीसह महाजल्लोष

उद्या रविवारी (ता. १९) सायंकाळी सहा वाजता उमंग सृष्टी महिला ढोल ताशा पथकाचे धमाकेदार सादरीकरण होईल. यावेळी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी व लेझिम पथक देखील सहभागी होणार आहेत.

यानिमित्ताने खासदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपतींची महाआरती होईल. या कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संपदा पाटील यांनी केले आहे.

Sampada Patil and coach Anirudh Dhusar with the drum team of Umang Samajshilpi Mahila Mandal.
Jalgaon News : कापूस खरेदीसाठी ‘CCI’ खुल्या बाजारात उतरलाच नाही!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com