
Jalgaon News : कारच्या धडकेत बालक जखमी
जळगाव : शहरातील बजरंग बोगद्याजवळ कारच्या धडकेत पाचवर्षीय बालक जखमी झाले. वाघनगरमधील हेमंत भोई गुरुवारी (ता. ५) सायंकाळी सहाला मुलगा रोनित याच्यासोबत गणेश कॉलनी परिसरातील बजरंग बोगद्याजवळ आले होते. (Child injured in car collision Jalgaon News)
हेही वाचा: Nandurbar News : लाचखोर तलाठ्याला दोन वर्षांची शिक्षा; शहादा न्यायालयाचा निकाल
यादरम्यान कारने (एमएच १९, बीजे ५७००) रोनित यास धडक दिली. या धडकेत डोक्याला, कपाळावर, गुडघ्याजवळ व पोटावर गंभीर दुखापत झाल्याने रोनित जखमी झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.
मुलावर उपचारानंतर दोन दिवसांनंतर हेमंत भोई यांनी शनिवारी (ता. ७) दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिसांत कारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहाय्यक निरीक्षक महेंद्र पाटील तपास करीत आहेत.
हेही वाचा: Nandurbar News : चोरट्यांनी गॅरेज दुकानांकडे वळवला मोर्चा