Chopda Sugar Factory : चोसाका ग्रामसभेप्रमाणे उसप्रचार सभा घेणार; उस लागवड वाढविण्यासाठी प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chosaka will hold sugercane campaign meeting like Gram Sabha jalgaon news

Chopda Sugar Factory : चोसाका ग्रामसभेप्रमाणे उसप्रचार सभा घेणार; उस लागवड वाढविण्यासाठी प्रयत्न

एप्रिल महिन्यापासून ऊस लागवड बाबत नियोजन केले असून जून जुलै मध्ये आडसाली उसाची लागवड केली जाते.ती लागवडीकडे लक्ष दिले जाणार आहे.बुलढाणा अर्बन पतसंस्था कडे १ कोटी ४१ लाख रुपये लिंकिंग शेअर्स रक्कम जमा आहे ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. (Chosaka will hold sugercane campaign meeting like Gram Sabha jalgaon news)

पश्चिम महाराष्ट्रात एकरी १५० टन ऊस उत्पादन केले जाते तेथील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल.बुलढाणा अर्बन बँकेचे कर्ज निल झाले आहे.उर्वरित कर्ज जे चोसाका (Chosaka) वर आहे त्याचे व्याज कसे कमी करता येईल याबाबत संचालक मंडळ समवेत बैठक घेऊन योग्य नियोजन केले जाईल.

चोपडा (जि. जळगाव) : शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नवनियुक्त संचालकांपुढील विविध आव्हानांसंदर्भात ‘सकाळ’ने मालिका प्रकाशित केली. यावर गुरुवारी (ता. १६) चोसाका अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळाने ‘सकाळ’कडे प्रतिक्रिया दिल्या आहेत.

त्यात ग्रामसभेप्रमाणे ऊसप्रचार सभा घेत उस लागवड वाढविली जाईल, दरवर्षी ५ लाख टन गाळप कसे होईल, यासाठी प्रयत्न केले जातील.

स्वतःचा ५ लाख टन ऊस कसा असेल, यात नवनवीन जाती उतारात वाढ, उत्पन्नात वाढ, कशी करता येईल, याबाबतीत बारामती ॲग्रोची मदत घेऊन प्रयत्न केले जातील, तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार ऊस बेणे उधारीने द्यावे लागेल. याबाबत बारामती ॲग्रोकडे विनंती करण्यात येईल, आदींबाबत नियोजन असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

एप्रिलपासून ऊस लागवडीबाबत नियोजन केले असून, जून, जुलैमध्ये आडसाली उसाची लागवड केली जाते. ती लागवडीकडे लक्ष दिले जाणार आहे. बुलढाणा अर्बन पतसंस्थेकडे १ कोटी ४१ लाख रुपये लिंकिंग शेअर्स रक्कम जमा आहे, ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

पश्चिम महाराष्ट्रात एकरी १५० टन ऊस उत्पादन केले जाते, तेथील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल. बुलढाणा अर्बन बँकेचे कर्ज निल झाले आहे. उर्वरित कर्ज जे चोसाकावर आहे, त्याचे व्याज कसे कमी करता येईल?याबाबत संचालक मंडळ समवेत बैठक घेऊन योग्य नियोजन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

उसाची रिकव्हरी साडेदहाच्या पुढे गेल्यास आपोआप एफआरपी रक्कम वाढेल. दरवर्षी ५ लाख गाळप झाल्यास टॅगिंग रक्कम, भाडे असे काही मिळून वर्षाकाठी सात ते साडेसात कोटी रुपये येतील त्यातून फेड करून चोसाका कामगार वेतन, पीएफ रक्कम, ऊसतोड वाहतूक अशी देणे दिली जातील, याबाबत

"विधानसभा माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, भाजपचे आत्माराम म्हाळके, जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल, ॲड. घनश्याम पाटील यांचे मार्गदर्शन घेत निर्णय घेण्यात येईल." - चंद्रहास गुजराथी, अध्यक्ष,चोसाका

"शेतकऱ्यांची देणी व इतर देणी ठरल्याप्रमाणे बारामती ॲग्रोशी चर्चा करून दिली जातील. कारखाना जर कर्जमुक्त करावयाचा असेल तर दरवर्षी किमान गाळप सात लाख झाले पाहिजे. चोपडा तालुक्यात ती कमी होण्याचे कारण म्हणजे ऊसतोडीसाठी होणारे हाल, उतारा नसल्याने योग्य भाव न मिळणे व उसावरील पांढरी माशीचा प्रादुर्भाव या साऱ्या बाबींसाठी बारामती ॲग्रोसोबत चेअरमन, संचालक मंडळ यांनी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चा सुरू केली आहे." - एस. बी. पाटील, उपाध्यक्ष, चोसाका

"सामाजिक बांधिलकी, सहानुभूती, यांचा विचार करून बारामती ॲग्रोकडे विनंती करून व्याजदर कमी करण्याबाबत विचार विनिमय केला जाईल, बंटी शेठ व्यापारी यांचा व्यवहाराबाबत काहीएक माहिती नाही. ऊस लागवड वाढली तर बाहेरून ऊस आणण्याची गरज पडणार नाही. फक्त ऊसतोड वेळेवर कशी होईल, याकडे लक्ष दिले जाईल." - डॉ. सुरेश पाटील, माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक, चोसाका

"चोसाकाच्या माजी अध्यक्षांनी सर्व श्रेष्ठी, संचालक मंडळ, तालुक्यातील सभासद यांना विश्वासात न घेता बारामती ॲग्रोने चोसाकाला दिलेल्या पैशांवर परस्पर १२ टक्के व्याज देण्याचा करार करून दिला, जो सर्व समस्यांचे मूळ आहे. ज्येष्ठनेते अरुणभाई गुजराथी व चेअरमन चंद्रहास गुजराथी या संदर्भात बारामती ॲग्रोशी चर्चा करून मार्ग काढणार आहेत." - शशिकांत देवरे, माजी उपाध्यक्ष, विद्यमान संचालक, चोसाका

"चोसाका संचालक म्हणून मला दुसऱ्यांदा संधी मिळाली. त्याबद्दल मी सर्वप्रथम काँग्रेसचे नेते ॲड. संदीप पाटील यांचे आभार मानतो, या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीनही संचालक चोसाका, शेतकरी, सभासद व कर्मचारी हिताच्या निर्णयाच्या बाजूनेच राहू, कारखाना भाडेतत्वावर असला तरी लवकरात लवकर तो कर्जमुक्त होईल यासाठीचे प्रयत्नरत राहणार आहेत." - गोपाल धनगर, संचालक, चोसाका

"संस्थेच्या हितासाठी नेहमी महिला संचालक म्हणून सहकार्य राहील. ‘बारामती ॲग्रो’ला विनंती करून व्याजदर कमी करण्याबाबत प्रयत्न केले जातील. शेतकऱ्याला उसाला भाव कसा व्यवस्थित मिळेल व ऊसतोड वेळेवर होईल, याची काळजी घेतली जाईल." - मीनाक्षी सोनवणे, संचालिका, चोसाका