Jalgaon Crime News : पोलिस अधीक्षकांच्या प्रसादानंतर झोंबाझोंबी करणारे 8 अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime News : पोलिस अधीक्षकांच्या प्रसादानंतर झोंबाझोंबी करणारे 8 अटकेत

जळगाव : पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात महिला सहाय्य कक्षाबाहेरच आपसांत झोंबाझोंबी करणाऱ्यांवर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची नजर पडली.

संशयितांची त्यांनी स्वतः चौकशी केली. त्यानंतर संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक (arrested) करण्यात आली. (after beating 8 criminals arrested by Superintendent of Police jalgaon crime news)

रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल प्राणघातक हल्ल्यातील संशयित सागर पाटील याची जामिनावर मुक्तता झाली. नंतर तपासाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या सुचनेनुसार प्रतिबंधात्मक कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेत त्याला रवाना केले. संशयिताला रामानंदनगर पोलिसांनी गुन्हे शाखेत आणल्यावर त्याच्या दहा ते १५ साथीदारांनी पोलिस अधीक्षक कार्यालय आवारात गर्दी केली होती.

सायंकाळी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार आयपी मेसकडे जात असताना, त्यांना गोंधळ दिसला. गोंधळ घालणारे तरुण अट्टल गुन्हेगाराच्या समर्थनार्थ आल्याचे कळताच पोलिस अधीक्षकांनी हातात पोलिस दांडा घेउन त्या सर्वांना यथेच्छ चोप दिला. संशयितांना ताब्यात घेऊन जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात कारवाईसाठी नेण्यात आले.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

गौरव समाधान सोनवणे (रा. गुजराल पेट्रोलपंप), प्रसाद कमलाकर पाटील (निवृत्तीनगर), मोहीत संदीप पाटील (संत मीराबाईनगर, पिंप्राळा शिवार), प्रथमेश सुरेश साळुंखे (ओमशांतीनगर), खुशाल गोकुळ पाटील (आहुजानगर, निमखेडी शिवार), निरज जितेंद्र सूर्यवंशी (आर. एल. कॉलनी, पिंप्राळा), निर्भय शिरसाठ (प्रबुद्धनगर, पिंप्राळा) आणि तेजस सुहास गोसावी (दादावाडी मंदिराजवळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक राजेश पदमर तपास करत आहे.