Jalgaon Lok Sabha Election : फेब्रुवारीअखेर 100 टक्के न‍िधी खर्चाचे ‘टार्गेट’ : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, सर्व विभाग प्रमुखांनी काम सुरू असलेल्या ठिकाणांना भेटी द्याव्यात. कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू झाले नसल्यास ठेकेदारांना तत्काळ सूचना देण्यात याव्यात.
District Collector Ayush Prasad while guiding in the meeting held on Friday to review the works under the District Annual Plan.
District Collector Ayush Prasad while guiding in the meeting held on Friday to review the works under the District Annual Plan.esakal

Jalgaon Loksabha Election : जिल्हा नियोजन निधी प्राप्त होणाऱ्या सर्व यंत्रणांनी २०२३-२४ वर्षाच्या कामांचे शंभर टक्के कार्यारंभ आदेश १५ द‍िवसात देण्यात यावे.

तसेच फेब्रुवारी अखेर शंभर टक्के न‍िधी खर्च करण्याचे ‘टार्गेट’ निश्‍चित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. (Collector Ayush Prasad statement Lok sabha Election Target of 100 percent fund expenditure by end of February)

आगामी लोकसभा निवडणूकांची सगळीकडे तयारी सुरु असतांना, आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर त्याचे पडसाद दिसले. त्यामुळे इलेक्शन इफेक्ट म्हणून डीपीसी बैठकीची चर्चा होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत, नियोजन समितीच्या वार्षिक योजनेतील २०२३-२४ मधील सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी घटक योजनेतील प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश, निधी वितरणाचा तसेच आमदारांनी स्थानीक विकास निधीतून सुचविलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, यावल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयाचे अध‍िकारी राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

कामांना भेट द्या

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, सर्व विभाग प्रमुखांनी काम सुरू असलेल्या ठिकाणांना भेटी द्याव्यात. कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू झाले नसल्यास ठेकेदारांना तत्काळ सूचना देण्यात याव्यात. २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यात यावी.

District Collector Ayush Prasad while guiding in the meeting held on Friday to review the works under the District Annual Plan.
Jalgaon Municipality News : बेशिस्त वाहन धारकांविरोधात कारवाईचा बडगा

अर्धवट स्वरूपात पूर्ण झालेल्या कामांचे उद्‌घाटन करण्यात येऊ नये. नवीन कामे ऐनवेळी प्रस्ताव‍ित करण्यात येऊ नयेत. २०२४-२५ चा प्रारूप आराखडा ही सादर करावा; असे ही त्यांनी सांगितले.

तांत्रिक मान्यतेनंतरच.....

ज्या कामांना तांत्रिक मान्यता द‍िली आहे. तीच कामे करण्यात यावी. तांत्रिक मान्यता नसलेली कामे करण्यात येवू नये. तसेच जेवढा न‍िधी मंजूर आहे तेवढ्याच न‍िधीची प्रशासकीय मान्यता घेण्यात यावी. बीडीएस वरील न‍िधी तत्काळ देण्यात यावा.

ज‍िल्हा पर‍िषद यंत्रणेने वर्ग-शाळा-खोल्यांचे काम चालू आहे किंवा नाही, याची खात्री करावी. अंगणवाड्यांचे प्रलंब‍ित बांधकामे १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात यावे. ज‍िल्हा न‍ियोजन योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा मेळावा घेतला जावा.

लिफ्ट सात दिवसांत

फेबुवारी २०२४ मह‍िन्यात ज‍िल्हा न‍ियोजन कामांचे भूमिपूजन कार्यक्रम ज‍िल्ह्यातील ‍त‍िन्ही मंत्र्यांच्या हस्ते करण्यात यावे. भूमिपूजन व उद्‌घाटन कार्यक्रमात कामगारांचा यथोच‍ित करण्यात करण्यात यावा. ज‍िल्हाधिकारी कार्यालयातील ल‍िफ्टचे काम सात द‍िवसात पूर्ण करण्यात यावे, अशा सूचनाही ज‍िल्हाध‍िकाऱ्यांनी द‍िल्या.

District Collector Ayush Prasad while guiding in the meeting held on Friday to review the works under the District Annual Plan.
Loksabha Election 2024 : सामान्य जनतेला आकर्षित करण्यासाठी काँग्रेसची खेळी; जाहीरनाम्यासंदर्भात घेतला 'हा' निर्णय

स्थानीक विकास न‍िधी, खासदार न‍िधी, प्रादेश‍िक पर्यटन विकास कार्यक्रमाचा आढावा घेतांना ज‍िल्हाध‍िकारी म्हणाले, आमदार व खासदार निधीच्या कामांच्या शंभर टक्के प्रशासकीय मान्यता देण्यात याव्यात.

शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य पराग पाटील यांचे त्रयस्थ पक्षाद्वारे करण्यात येणाऱ्या कामांची गुणवत्ता तपासणीच्या सुचना

दिल्या. प्रा. दीपक सूर्यवंशी यांचे जिल्हा न‍ियोजन मार्फत राबव‍िण्यात येणाऱ्या योजनांचा सामाज‍िक पर‍िणामांचा अभ्यास या व‍िषयावर सादरीकरण झाले.

District Collector Ayush Prasad while guiding in the meeting held on Friday to review the works under the District Annual Plan.
Loksabha Election: भिवंडी लोकसभेसाठी कुणबी उमेदवार देण्याची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com