Jalgaon Banana Insurance : 43 हजार हेक्टर्सवरील केळी विम्याची भरपाई तातडीने मिळणार;रक्षा खडसेंच्या प्रयत्नांना यश

Raksha Khadse
Raksha Khadseesakal

Jalgaon Banana Insurance : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ४३ हजार हेक्टर्स केळीवरील पीकविम्याचे पैसे तातडीने देण्याचे निर्देश खासदार रक्षा खडसे यांनी विमा कंपनीला दिले आहेत.

उर्वरित विमा क्षेत्राची तातडीने सॅटॅलाइटवरून पाहणी करून त्याप्रमाणे ही भरपाईचे पैसे दिले जाणार असल्याचे खासदार खडसे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले. (Compensation for banana insurance on 43 thousand hectares will be received immediately jalgaon news)

केळी पीकविम्याच्या या प्रश्नावर आज (ता. २७) दिल्लीतील कृषी भवनमध्ये विमा कंपनीचे अधिकारी, राज्य कृषी विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली. खासदार रक्षा खडसे बैठकीला ऑनलाइन उपस्थित होत्या.

ज्या केळी क्षेत्राचे सर्वेक्षण झाले आहे, अशा सुमारे ४३ हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी पीकविम्याच्या भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना तातडीने देण्याचे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. मात्र उर्वरित क्षेत्राच्या सॅटेलाइट सर्वेक्षणावर विमा कंपनीचे अधिकारी अडून बसले व या सर्व क्षेत्रात प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची भूमिका विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतली.

Raksha Khadse
Jalgaon Banana Crop : वरखेडेची केळी थेट सौदी अरेबियात! 200 क्विंटल शेतमाल रवाना

मात्र खासदार खडसे यांनी यातील बहुतेक क्षेत्रात आता केळीची कापणी झाली असून, प्रत्यक्ष पाहणी केली तर तिथे केळी सापडणार नसल्याचे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना पटवून दिले. त्यामुळे या उर्वरित क्षेत्राची पाहणी विमा कंपनीचे अधिकारी फेब्रुवारी महिन्यातील सॅटेलाइटची प्रतिमा पाहून करणार आहेत.

त्यानंतर त्या अहवालानुसार केळी उत्पादक शेतकऱ्यांना विमा भरपाईचे पैसे मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार खडसे यांच्या या भूमिकेमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण असून, तातडीने पैसे शेतकऱ्यांच्या खाती विमा कंपनीने आता वर्ग करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Raksha Khadse
Beneficial Raw Banana: चांगल्या आरोग्यासाठी पिकलेली केळीच कशाला हवी, कच्चे केळ खाण्याचेही आहेत अनेक फायदे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com