रेल्वे डीआरएम कार्यालयात कोरोनाचा शिरकाव.. तब्बल अडीचशेच्यावर कर्मचारी बाधित

रेल्वे डीआरएम कार्यालयात कोरोनाचा शिरकाव.. तब्बल अडीचशेच्यावर कर्मचारी बाधित
Updated on: 

भुसावळ : शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता रेल्वे कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भुसावळ रेल्वे मंडल कार्यालयात पाचशे कर्मचारी काम करत असून, यापैकी 256 कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

येथील डीआरएम कार्यालयातील विविध विभागातील दररोज एक ते दोन कर्मचारी यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. याच पार्श्वभुमीवर डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली डीआरएम कार्यालयातील आतील प्रवेशद्वाराजवळ कर्मचार्‍यांची स्वॅब तपासणी करण्यात आली. याच तपासणीत 256 कर्मचार्‍यांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहे. यामुळे डीआरएम कार्यालयातील कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली. 256 पैकी 86 कर्मचारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून उर्वरित कर्मचारी होम क्वारंटईन आहेत. तीन ते चार दिवस दररोज डीआरएम कार्यालयात स्वॅब तपासणी मोहिम राबविली जाणार आहे. यामुळे डीआरएम कार्यालयात सर्वच कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी घेतली जाणार आहे. कर्मचार्‍यांसोबत अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांचीही तपासणी केली जाणार आहे.

तीन शिफ्टमध्ये कामाची विभागणी
खबरदारीचा उपाय म्हणून वेळोवेळी सॅनिटाजेशन करणे, हात धुणे ,मास्क वापरणे ,याचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. रेलवे मण्डल कार्यालयामध्ये 40 ते 30 टक्के कर्मचार्‍यांवर सध्या काम चालवले जात आहे. कर्मचार्‍यांना त्यांची कामे तीन शिफ्टमध्ये विभागून दिली आहे. यात 7 ते 12, 1 ते 6 व महिलांसाठी 10 ते 4 अश्या तीन वेगवेगळ्या शिफ्ट ठरवून दिल्या आहे. ही अंमलबजावणी सुरू केली आहे. वर्कफॉर्म होम केले जाणार आहे. ज्यांना अत्यंत गरज आहे अशा कर्मचाऱ्यांची आयडेंटिफिकेशन व चाचणी करून मंडल कार्यालयामध्ये प्रवेश दिला जात आहे.

आवर्जून वाचा- सांगलीसारखाच भाजपचा ‘करेक्‍ट’ कार्यक्रम जळगावात; शिवसेनेचा डाव चालला, महापौरपदी जयश्री महाजन


रेल्वेतर्फे उपाययोजना
रेल्वे हॉस्पिटल मध्ये सध्या चार वेंटीलेटर असून 11 पॉझिटिव रुग्णांवर ऑक्सीजन चा वापर करण्यात येत आहे. अप्पर मंडल अधिकाऱ्यांनी प्रवाशांकरिता योग्य ती जबाबदारी म्हणून रेल्वे गाडी आल्यानंतर वेळोवेळी फवारणी करने,व सॅनिटाजेशन करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भुसावळ तालुक्यामध्ये एकाही हॉस्पिटलला व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचे सुविधा नसल्यामुळे रेल्वेच्या हॉस्पिटल सध्या कोविड हॉस्पिटल म्हणून अधिग्रहित करण्यात आले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Crime News Newly Married Woman Accused in Poisoning Incident Involving Husband and Two Others in Jalgaon
Solapur Municipal Clerk Mouli Without Both Hands Performs Aarti In Inspiring Moment At Deepstambh Foundation Event
Jalgaon gold price
Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Marathi News Esakal
www.esakal.com